20 April 2025 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

रिलायन्स AGM | ऊर्जा क्षेत्रात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार | Jio 5G स्मार्टफोन लाँच

Reliance AGM 2021

मुंबई, २४ जून | आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM)ची सुरुवात केली आहे. बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. मुकेश अंबानी यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 2 टक्के घट दिसून येत आहे. या बैठकीत कंपनीचे सर्व 12 संचालक उपस्थित आहेत. बैठकीच्या सुरूवातीस, कंपनीने कोविड -19 मुळे देशातील जीव गमावणाऱ्या सर्व लोकांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुकेश अंबानींचे भाषण:
ते म्हणाले की, मागील AGM च्या तुलनेत आमचा व्यवसाय अपेक्षेपेक्षा अधिक चांगला झाला आहे. पण रिलायन्सच्या मानवी सेवेमुळे आम्हाला अधिक आनंद झाला. रिलायन्सने कोरोनाच्या कठीण काळात हे काम केले. कोरोनाच्या काळात आमच्या रिलायन्स कुटुंबाने राष्ट्राप्रमाणे कर्तव्य बजावले. आम्हाला विश्वास आहे की गेल्या एक वर्षात आमच्या प्रयत्नांनी आपले संस्थापक अध्यक्ष धीरूभाई अंबानी यांचे प्रयत्न पुढे केले आहेत. यापूर्वी मुकेश अंबानी यांनी कोरोनामुळे जीव गमावलेल्या रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांसाठी एक मिनिट मौन ठेवले.

मुकेश अंबानी म्हणाले की, आमचे आजोबा आमच्यासमवेत असते तर त्यांना अभिमान वाटला असता. हे तेच रिलायन्स आहे, जे त्यांना नेहमीच पाहायचे होते, जिथे प्रत्येक माणूस गरजूंसाठी आपले संपूर्ण योगदान देतो. आम्ही आमच्या समुदायाची आणि देशाच्या सेवेत व्यस्त आहोत. यावर्षीपासून जिओ इन्स्टिट्यूट नवी मुंबई कॅम्पसमध्ये शैक्षणिक सत्र सुरू करणार आहे.

ईशा-आकाशचे भाषण:
मुकेश अंबानींच्या भाषणानंतर सुमारे 5 मिनिटानंतर ईशा आणि आकाश हे रिलायन्स फॅमिलीशी बोलले. त्यांनी केअर अँड एम्पॅथी पॉलिसीबद्दल सांगितले. रिलायन्सने त्यांच्या देखरेखीखाली कोरोनादरम्यान मदतकार्य पूर्ण केले असल्याचे ईशा आणि आकाश अंबानी यांनी सांगितले.

रिलायन्सकडून Jio Phone Next लाँच:
या बैठकीत रिलायन्सकडून अपेक्षेप्रमाणे 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला. रिलायन्स आणि गुगल यांनी संयुक्तपणे या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 10 सप्टेंबरला हा फोन बाजारपेठेत येईल.

हा देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन ठरण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये इंटरनेटचा वेग जास्त असेल. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन आयुष्यात आणि कामकाजाच्या पद्धतीत मोठे बदल होतील, असा दावा यावेळी गुगलचे सीईओ सुंदर पिचाईल यांनी केला.

Jio Phone Next या स्मार्टफोनची किंमती किती असेल, याबाबत रिलायन्सकडून खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, जाणकारांच्या अंदाजानुसार या स्मार्टफोनची किंमत साधारण 4000 रुपयांच्या आसपास असेल. जिओ-गुगलाच हा अँड्रॉईड स्मार्टफोन गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Big announcements by Mukesh Ambani in Reliance AGM 2021 news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या