18 January 2025 6:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव
x

सिलिंडर महाग झालाय हे खरं | पण स्वस्तात गॅस बुक करण्यासाठी हे करा

Book, Indane refill LPG, Amazon pay, Cashback

मुंबई, ०६ मार्च: मुंबई आणि दिल्लीमध्ये 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 819 रुपयापर्यंत आलीये. तर चेन्नईमध्ये ही किंमत 835 रुपये आहे. कोलकात्यामध्ये गॅस सिलिंडर 845 रुपयांवर पोहोचले आहे. सामान्यत: गॅस सिलिंडर खरेदी करण्याठी कोणत्याही ऑफर नसतात. किंवा सिलिंडर कमी किमतीत खरेदी करण्यासाठी कोणतेही दुसरे पर्याय उपलब्ध नसतात. मात्र, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने एक मार्ग सांगितला आहे. कंपनीने सांगितलेली ट्रिक वापरुन गॅस खरेदी करताना 50 रुपयांची बचत केली जाऊ शकते.

तुम्ही बाजारभावापेक्षा 50 रुपये कमी देऊन गॅस सिलिंडर घेऊ शकता. इंडेन (Indane) या सरकारी कंपनीनं ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. स्वस्तात गॅस सिलिंडर कसा बुक करता येईल याची आपण माहिती घेऊयात.

इंडियन ऑईलच्या ट्विटनुसार तुम्ही आता अ‍ॅमेझॉन पे द्वारे एलपीजी गॅस सिलिंडर बुक करू शकता. या माध्यमातून ग्राहकांना प्रथमच सिलिंडर बुकिंगवर 50 रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. कंपनीनं याबाबत सागितलं आहे. मात्र हा कॅशबॅक फक्त एकदाच दिला जाणार आहे. दरम्यान, सध्या गॅस सिलिंडरच्या किमती वाढलेल्या असल्यामुळे या कॅशबॅक ऑफरचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन इंडियन ऑईलने केले आहे.

असे वाचवा 50 रुपये
गॅस खरेदी करताना 50 रुपये वाचवले जाऊ शकतात. त्यासाठी इंडियन ऑईलने खास ऑफर सांगितली आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार इंडियन ऑईल म्हणजेच इंण्डेन या कंपनीचा गॅस खरेदी केल्यांतर 50 रुपये कॅशबॅक मिळू शकतो. त्यासाठी एलपीजी सिलिंडरची बुकिंग अ‌ॅमेझॉन पे (Amazon Pay) च्या माध्यमातून करावी लागेल. अ‌ॅमेझॉन पेच्या माध्यमातून गॅस बुकिंग केल्यानंतर अ‌ॅमेझॉनतर्फे 50 रुपये खात्यात कॅशबॅक म्हणून परत पाठवले जातील. म्हणजेच या मार्गाने 14.2 किलोचा गॅस सिलिंडर खरेदी करताना 50 रुपयांची बचत केली जाऊ शकते.

 

News English Summary: According to Indian Oil’s tweet, you can now book LPG gas cylinders through Amazon Pay. Through this, customers will be given a cashback of Rs 50 on cylinder booking for the first time. The company has stated this. However, this cashback will be given only once. Meanwhile, Indian Oil has appealed to the maximum number of citizens to take advantage of the cashback offer as gas cylinder prices have gone up.

News English Title: Book and pay for your Indane refill LPG through amazon pay and get flat Rs 50 cashback on your first transaction news updates.

हॅशटॅग्स

#Gas cylinder(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x