3 December 2024 11:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

शेअर मार्केट गडगडला, सेन्सेक्समध्ये ५७२ अंकांची घसरण, २.२८ लाख कोटींचे नुकसान

मुंबई : शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली आहे. हाती ते;आलेल्या बातमीनुसार सेन्सेक्स तब्बल ५७२ अंकांनी खाली घसरला आहे. तर निफ्टीत सुद्धा मोठी घसरण पहायला मिळाली. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचे तब्बल २.२८ लाख कोटी रुपयांचे एवढे नुकसान झाले आहे.

अमेरिका आणि चीनमधील ट्रेड संघर्ष आणि दुरावत चाललेले संबंध तसेच त्यातील अनिश्चिततेचे वातावरण हे प्रमुख कारण सांगितलं जात आहे. त्यात अजून भर म्हणजे भारतीय रुपयाचे आंतरराष्ट्रीय बाजारात झालेले अवमूल्यन आणि पुढच्या आठवड्यात लागणारे ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल या सर्व विषयांचे थेट पडसाद आज शेअर बाजारावर उमटल्याचे तज्ज्ञ सांगतात.

निफ्टीची दिवसभरात एकूण १८१ अंकांनी घसरुन होऊन अखेर १०, ६०१ वर बंद झाला. तर दुसरीकडे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५७२ अंकांनी घसरुन ३५, ३१२ वर स्थिरावला. यामध्ये सर्वाधिक जास्त घसरण बांधकाम आणि आयटी क्षेत्रातील शेअरमध्ये झाल्याचे पहायला मिळाले.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x