18 April 2025 9:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

BSNL'च्या २० हजार कंत्राटी कामगारांना घरचा रस्ता | वर्षभर पगारही दिला नाही

BSNL, Contract workers, Unemployment, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ५ सप्टेंबर : कोरोना व्हायरसमुळे अनेक कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. यातच आता एका सरकारी कंपनीने सुद्धा आपल्या २० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

टेलिकॉम क्षेत्रातील सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) जवळजवळ २० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा बीएसएनएलच्या कर्मचारी युनियने केला आहे. याआधी बीएसएनएलने ३० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांना गेल्या एक वर्षाहून अधिक काळ वेतन दिले गेले नाही, असेही युनियने म्हटले आहे.

बीएसएनएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवार यांना लिहिलेल्या पत्रात युनियनने म्हटले आहे की, स्वेच्छा सेवानिवृत्ती योजनेनंतर (व्हीआरएस) कंपनीची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली आहे. विविध शहरांमध्ये मनुष्यबळ नसल्यामुळे नेटवर्क सदोषपणाची समस्या वाढली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या एकूण धोरणांवरच राहुल गांधी यांनी हल्लबोल केला आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे की, “मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम खाजगीकरण, कोविड केवळ एक कारण आहे, सरकारी कार्यालय कर्मचारी मुक्त करायची आहेत, तरूणांचं भविष्य हिरावून घ्यायचंय आणि मित्रांना पुढे घेऊन जायचंय, असा शाब्दिक प्रहार राहुल गांधींनी केला आहे.

तत्पूर्वी, मोदी सरकारने नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय मल्ल्यांसह एकूण ५० थकबाकीदारांचे सुमारे ६८,६०७ कोटी रुपये माफ केले असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केला होता. या बरोबरच केंद्रातील मोदी सरकारने ६.६६ लाख कोटी रुपयांचे कर्ज सन २०१४ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान माफ केले असाही आरोप काँग्रेसने केला होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० बड्या कर्जबुडव्यांचे जवळपास ६८ हजार ६०७ कोटी रुपये कर्ज माफ केल्याचं धक्कादायक माहिती उघड झाली होती. यात पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहूल चोकसीचं नावही समाविष्ट होतं. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून हे सत्य समोर आलं होतं. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५० मोठे कर्जबुडवे आणि त्यांची १६ फेब्रुवारीपर्यंत कर्जाची स्थिती काय आहे? याची माहिती मागवली होती.

 

News English Summary: Government owned BSNL has issued a directive to all its units to curtail expenditure on contract works which is likely to result in retrenchment of around 20,000 workers engaged with the telecom firm through contractors, according to BSNL Employees’ Union.

News English Title: BSNL preparing to expel workers union claim 20000 and contract workers Marathi News LIVE Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या