Budget 2021 | मद्यप्रेमींना आर्थिक फटका | दारूवर कृषी अधिभार

नवी दिल्ली, ०१ फेब्रुवारी: Budget 2021 LIVE : कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना महामारी, अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक आणि बेरोजगारीचा गंभीर प्रश्न या सर्व समस्यांवर उपाय म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. दुसरीकडे ज्या मुद्यांवर मोदी सरकार सत्तेत आलं त्याकडे सध्या मोदी सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय.
आयकराच्या संरचनेसंदर्भात कोणतीही मोठी घोषणा करण्यात आलेली नसून बजेटकडे लक्ष लागलेल्या सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळालेला नाही. आयकराच्या संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा. ७५ वर्षांवरील नागरिकांना पेन्शमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर रिटर्न भरण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अल्कोहोलयुक्त पेयांवरील सेसच्या दरात तब्बल १०० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मद्य आणि मद्ययुक्त पेय यांच्या किमतीत वाढ होणार आहे.
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य लोकं कंटाळली असताना मोदी सरकारने त्यांना अजून एक धक्का दिला आहे. कारण डिझेलवर 4 रूपयांचा कृषी सेस, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस लावण्यात आल्यानं पेट्रोल लवकरच शंभरी पार करु शकते.
News English Summary: In the financial year 2021-22, the cess rate on alcoholic beverages has been increased by 100 per cent. Therefore, according to experts, the implementation of this budget will lead to an increase in the price of alcohol and alcoholic beverages.
News English Title: Budget 2021 CESS rate on alcoholic beverages has been increased by 100 per cent news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL