23 February 2025 8:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

विदेशी चलन प्रकरण | बिल्डर अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ED ची धाड

Builder Avinash Bhosale, Raided by ED, Directorate of Enforcement

पुणे, १० फेब्रुवारी: बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने छापेमारी केली आहे. ED चे अधिकारी सकाळी 8:30 पासून ABIL हाऊसमध्ये झाडाझडती करत आहेत. अविनाश भोसले हे मोठे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. फेमासंबंधीच्या प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. हे 6 वर्षांपूर्वीचे विदेशी चलन प्रकरण आहे. (Builder Avinash Bhosale office has been raided by the Directorate of Enforcement)

आयबीची परवानगी न घेता विदेशी बँकेत खोललेल्या खात्यात 500 कोटी कुठून आले याचा तपास ईडी करतेय. या प्रकरणी यापूर्वीही त्यांची दोन वेळा चौकशी झाली होती आणि छापा टाकण्यात आला होता.

मागील काही दिवसांपासून ED च्या फेऱ्यात चौकशीला सामोरे जात असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ED ने छापा टाकलाय. सकाळी साडे आठ वाजताच ईडीचं पथक पुण्यातील ABIL या कार्यालयात दाखल झालं. केंद्रीय सुरक्षा दलाच्या गार्डचा पहारा सध्या या कार्यालयात आहे. विदेशी चलन प्रकारात चौकशी सुरु असताना ईडीचं पथक थेट पुण्यात तळ ठोकून बसल्याने, भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी राज्याचे सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांची पत्नी स्वप्नाली भोसले यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आलेली. तसेच 27 नोव्हेंबर 2020 रोजी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली. स्वप्नाली भोसले या अविनाश भोसले यांची कन्या असून विश्वजीत यांच्या पत्नी आहेत.

 

News English Summary: Builder Avinash Bhosale’s office has been raided by the Directorate of Enforcement (ED). ED officials have been patrolling ABIL House since 8:30 p.m. Avinash Bhosale is a big builder and hotelier. He is being questioned by the ED in the FEMA case. This is a foreign currency case from 6 years ago.

News English Title: Builder Avinash Bhosale’s office has been raided by the Directorate of Enforcement news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pune(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x