18 November 2024 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024
x

‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ धोरणामुळे अनेक भारतीयांना अमेरिका सोडावी लागेल?

नवी दिल्ली : अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ या धोरणानुसार नव्या प्रस्तावावर विचार सुरू केलेला. त्यामुळे अमेरिकेतील भारतीय नोकरदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. या धोरणामुळे अनेक भारतीयांवर अमेरिका सोडण्याची वेळ येऊ शकते.

ट्रम्प प्रशासनाच्या या धोरणानुसार व्हिसाच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ किंवा नूतनीकरणासाठी केलेला अर्ज प्रशासनाकडून फेटाळला गेला तर अमेरिकास्थित त्या भारतीयांवर अमेरिका सोडण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे जर आता ‘एच -१ बी’ व्हिसाचा नूतनीकरण अर्ज फेटाळल्यास थेट भारतात रवानगी होणार आहे. त्यामुळे अमेरिकास्थित भारतीयांमध्ये चिंतेच वातावरण आहे.

ट्रम्प प्रशासनाच ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ हे धोरण २८ जूनपासून लागू झालं असून त्यासंबंधित सूचना गेल्याच आठवड्यात अमेरिकन सरकारच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आली आहे. त्यानुसार व्हिसाच्या मुदतीचा कालावधी संपल्यानंतर मुदतवाढ किंवा नूतनीकरण तसेच ‘चेंज ऑफ स्टेटस’साठी केलेला अर्ज जर फेटाळला गेला, तर त्या भारतीय व्यक्तीवर अमेरिकेतून हद्दपार करण्याची कारवाई केली जाऊ शकते. यात आणखी भर म्हणून एनटीए म्हणजे ‘नोटीस टू अपिअर’ बजावल्यानंतर कोर्टापुढे हजेरी न लावल्यास अमेरिकेत पुनर्प्रवेशासाठी ५ वर्षांची बंदी लागू केली जाऊ शकते.

अमेरिकेतील व्हिसाधारक भारतीय २०१७
१. २५ ते ३४ वयोगटातील ६६.२ टक्के
२. नोकरीबरोबरच पदवी घेणारे ४५.२ टक्के
३. एम.एस. बरोबरच नोकरी करणारे ४४.५ टक्के
४. डॉक्‍टरेट करणारे नागरिक ६.८ टक्के
५. संगणकक्षेत्राशी निगडित ६९.८ टक्के

हॅशटॅग्स

#Donald Trump(89)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x