मोठ्या उद्योगांसह फेरीवाले, दुकानदारांनाही कर्ज देणार; मोदी सरकारची घोषणा
नवी दिल्ली, १ जून: देशात कोरोनाचं संकट गहिरं होत जातंय. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात रुतलेलं आर्थिक चक्र पुन्हा वर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत केंद्रीय मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाची माहिती, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी आणि नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिली.
Minimum support prices (MSP) for 14 kharif crops increased by 50- 83%, to provide relief to the farmers: Union Minister Narendra Tomar pic.twitter.com/9tnuG0c0WY
— ANI (@ANI) June 1, 2020
प्रकाश जावडेकर म्हणाले की, एमएसएमईमुळे आपला जीडीपी वाढत आहे. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी एमएसएमईचा मोठा हात आहे. त्यामुळे एमएसएमईसाठी पर्याप्त फंड देण्यात आला असून त्यांच्यासाठी विविध योजनाही राबवण्यात आल्या आहेत. तसेच, लघु आणि मध्यम उद्योगही शेअर बाजारात सूचीबद्ध असणार आहेत.
एमएसएमईमध्ये नव्या नोकऱ्या उपलब्ध होऊ शकणार आहेत. एमएसएमईची मर्यादा आता ५ कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. आजच्या बैठकीत रोजगारवाढीचे निर्णय घेण्यात आल्याचेही जावडेकर म्हणाले. देशात ६ लाखांपेक्षा अधिक एमएसएमई आहेत. त्यामुळे या एमएसएमईमध्ये असणाऱ्या लहान-मोठ्या उद्योगांना उभारी येण्याकरता कर्ज व्यवस्था देण्यात आली आहे. या क्षेत्रातील उद्योगांना कर्ज देण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सलून, पान, आणि छोट्या दुकानादारांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
कोरोना काळातील संकटांच्या दृष्टीनं आज मोदी सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मंत्रिमडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नरेंद्र तोमर आणि नितीन गडकरींनी दिली. शेतमालाला मिळणाऱ्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय बैठकीत घेण्याचं तोमर यांनी सांगितलं. ‘मक्याची किमान आधारभूत किंमत ५३ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. तूर, मूग यांची आधारभूत किंमत ५८ टक्क्यांनी वाढवली गेली आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. १४ पिकांच्या किमतीत ५० ते ८३ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचं तोमर म्हणाले.
News English Summary: The corona crisis is deepening in the country. Therefore, efforts are being made by the Central Government to revive the economic cycle that was entrenched during the lockdown. Against that backdrop, the Union Cabinet met Prime Minister Narendra Modi today. Some important decisions were taken at this meeting. The decision was announced by Union Ministers Prakash Javadekar, Nitin Gadkari and Narendra Singh Tomar at a press conference.
News English Title: Cabinet approves MSP for 14 kharif crops farmers to get 50 83 percent more than cost News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार