21 September 2024 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Piccadily Agro Share Price | दारू नव्हे, हा दारू कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 1 लाखाचे झाले 96 लाख रुपये - Marathi News Penny Stocks | शेअर प्राईस 44 रुपये, 5 दिवसांत 45 टक्के परतावा दिला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News Salman Khan | सलमानच्या वडिलांना गँगस्टर लॉरेंस बिश्नोईकडून पुन्हा धमकी, महिला म्हणाली, 'लॉरेंस को भेजू क्या' - Marathi News Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - Marathi News Smart Investment | महिलांसाठी भन्नाट सरकारी योजना, फक्त 1000 रुपये बचत आणि मिळतील 2 लाख रुपये - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेत असाल तरा त्याआधी या 6 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होईल - Marathi News
x

केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर नारायण राणेंना कॅबिनेट समितीत देखील मोठी संधी

MP Narayan Rane

नवी दिल्ली, १३ जुलै | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कॅबिनेट विस्तार केला. यामध्ये मोठे फेरबदल करताना १२ मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता आणि नव्यांना संधी देण्यात आली. आता प्रमोशन मिळालेल्या काही मंत्र्यांना अजून एक संधी मिळाली आहे. कारण आता कॅबिनेट समित्यांमध्ये देखील अनेकांना संधी देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, किरण रिजिजू, अनुराग ठाकूर यांच्यासारख्या युवा चेहऱ्याबरोबरच महाराष्ट्राचे हेवीवेट नेते नारायण राणे यांनादेखील मंत्रिमंडळ समितीमध्ये जागा मिळाली आहे. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर सारखे मोठे चेहरे कॅबिनेटमधून बाहेर गेले आहेत. यामुळे कॅबिनेट समित्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री पदी वर्णी लागलेल्या खासदार नारायण राणे यांना केंद्रातील कॅबिनेट समितीमध्ये देखील संधी मिळाली आहे. इन्वेस्टमेंटआणि ग्रोथशी संबंधीत समितीवर नारायण राणे, ज्योतिरादित्य सिंधिया, अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे याचा महाराष्ट्राला नेमका काय फायदा होतो ते पाहावं लागणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Cabinet minister Narayan Rane on cabinet committees too news updates.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x