15 January 2025 3:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

पत्रात ते म्हणाले! मी एक व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो आहे, मला माफ करा!

CCD, Cafe Coffee Day, v g siddhartha, V G Siddharthas death body found

बंगळुरू : गेले दोन दिवस बेपत्ता असलेले ‘सीसीडी’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ यांनी मंगळुरु येथील नेत्रावती नदीत आत्महत्या केली असल्याचं सांगितलं आहे. आज नदीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. यावरून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच सिद्धार्थ यांनी एक पत्र देखील लिहिले होते.

व्ही. जी सिद्धार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई आणि प्रसिद्ध कॅफे चेन कॅफे कॉफी डे चे मालक आहेत. सिद्धार्थ हे सोमवारी आपल्या कारने प्रवास करत होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले. मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या परिसरात ते असल्याची माहिती मिळाली होती. कर्नाटक पोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. अखेर 36 तासांनंतर त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला.

तत्पूर्वी त्यांनी एक भावुक करणारं पत्र लिहिल्याचं बाहेर आलं.

३७ वर्षांच्या प्रचंड मेहनतीनंतर आणि परिश्रमानंतर आपण आपल्या कंपनीत ५० हजार रोजगारांची निर्मिती करु शकलो. एक चांगला ब्रांड तयार करु शकलो. मात्र यशस्वीरित्या हा व्यवसाय पुढे नेण्यामध्ये मी अपयशी ठरलो आहे. मी माझ्या परिने पूर्ण प्रयत्न केले मात्र हा व्यवसाय तारु शकलो नाही नफ्याकडे नेऊ शकलो नाही. माझ्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास टाकला त्यांची मी माफी मागतो. सध्या कंपनीला जो तोटा होतो आहे, त्यातून मी कंपनीला सावरु शकत नाही, या गोष्टीचा मला प्रचंड दबाव आला आहे. सहा महिन्यांपूर्वी मी माझ्या एका मित्राकडून मोठ्याप्रमाणावर कर्ज घेतले. माझ्यावर असलेल्या प्रचंड दबावामुळे मला हे पाऊल उचलावं लागलं. मी खूप काळ या सगळ्याचा सामना केला. मात्र मला आता हा तणाव सहन होत नाही. इक्विटी पार्टनर्सचाही प्रचंड दबाव माझ्यावर आहे.

मी तुम्हाला या पत्राद्वारे विनंती करतो आहे हा व्यवसाय आता नव्या संचालक मंडळाकडे देण्याची वेळ आली आहे. मला कोणाचीही फसवणूक करायची नव्हती. मी एक व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो आहे. मला खात्री आहे तुम्ही मला याबाबत माफ कराल. तुम्ही मला समजून घ्याल अशी खात्री आहे. कृपा करुन मला माफ करा.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x