Alert FasTag | टोल टॅक्सचे पूर्ण पैसे न भरल्यास फास्टॅग आणि बँक खाते होईल सील
मुंबई, ०६ मार्च: केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग (FASTag) अनिवार्य केले असून, ज्या वाहनांना फास्टॅग नाही, त्यांना देशभरातील इलेक्ट्रॉनिक टोल प्लाझावर दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या निवेदनानुसार, राष्ट्रीय महामार्गांवर टोल कर वसूल करणारे सर्व प्लाझा ‘फास्टॅग लेन’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. हा नियम 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून अंमलात आला आहे.
डिजिटल पद्धतीने पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. यामुळे देयकासाठी घेतला जाणारा वेळ कमी होईल आणि इंधनाचा वापर देखील कमी होईल. यामुळे प्रवास सोपा आणि एकूणच सुखकर होईल. एम आणि एन श्रेणीच्या गाड्यांसाठी फास्टॅगमधून टोल टॅक्स भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. श्रेणी एम म्हणजे प्रवासी वाहून नेणारी चार चाकी वाहने, तर एन श्रेणी म्हणजे माल वाहून नेणारी चार चाकी वाहने. ही वाहने मालाव्यतिरिक्त माणसांनाही घेऊन जाऊ शकतात.
दरम्यान, फास्टॅग तंत्रज्ञानाने सरकारचा महसूल वेगाने वाढत आहे, तसेच देशभरातील टोल प्लाझावरील वाहतूक कोंडीची समस्या कमी होत आहे. परंतु मानवरहित टोल व्यवस्थेचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक वाहने कमी टोल टॅक्स भरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा वाहन चालकांनी सावध व्हावे, कारण सरकारने त्यांचे फास्टॅग आणि बँक खाते सील करण्याची कारवाई सुरू केली आहे.
केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, सर्व प्रकारच्या खासगी कारसाठी जांभळ्या रंगाचा फास्टॅग दिला जातो. आणि टोल प्लाझावर त्यांच्यासाठी टोलचा दर एक समान आहे. परंतु, तीन चाकी आणि चार चाकी व्यवसायिक वाहनांच्या टोल टॅक्सचा दर त्यांच्या अॅक्सलनुसार ठरवला जातो. यासाठी व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीनुसार जांभळा, गुलाबी, नारंगी, पिवळा, आकाशी आणि काळ्या रंगाचा फास्टॅग त्यांच्या अॅक्सल भारानुसार जारी केला जातो.
हायवेवरील टोल प्लाझावर वाहनाच्या फास्टॅगच्या रंगाच्या आधारावर आपोआप टोल टॅक्स भरला जातो. अधिकार्यांनी म्हटले की, अनेक ठिकाणी व्यावसायिक वाहने ठरलेला फास्टॅग लावत नसल्याने कमी टोल टॅक्स भरण्याच्या तक्रारी येत आहेत. परंतु, यांची संख्या जास्त नाही. अशा वाहनांचा फास्टॅग आणि बँक खाते सील करण्याची कारवाई सुरू झाली आहे. ज्यामुळे त्या वाहनाला दुप्पट टॅक्स द्यावा लागेल. विभागाची ही कमतरता दूर करण्यासाठी काम सुरू आहे. ज्यामुळे कमी टॅक्स देणार्या वाहनांकडून दंडासह पूर्ण टॅक्स वसूल केला जाईल.
News English Summary: Fastag technology is rapidly increasing government revenue, as well as reducing traffic congestion at toll plazas across the country. But there are complaints that commercial vehicles are paying less toll tax, taking advantage of the unmanned toll system. Such drivers should be cautious, as the government has initiated action to seal their fastag and bank accounts.
News English Title: Central government has initiated action to seal their fastag and bank accounts news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Smart Investment | आयुष्य बदलण्यासाठी 442 रुपयाचा 'हा' फॉर्मुला कामी येईल, 1-2 नव्हे तर 5 करोडचे मालक व्हाल - Marathi News