19 January 2025 1:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

SVLL कंपनीचा बँक ऑफ महाराष्ट्रातील 'तो' १६१० कोटींचा कर्ज घोटाळा | काँग्रेसचे थेट आरोप कोणावर?

Chalak Se Malak scheme, loan scam, Siddhi Vinayak Logistic Limited, SVLL Scam, PM Modi

नवी दिल्ली, १३ मार्च: चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेला ‘चालक से मालक’ गैरव्यवहाराप्रकरणी मोठं राजकीय वादळ उठलं होतं. सुरतमधील सिद्धीविनायक लॉजिस्टिक्स लिमिटेड (एसव्हीएलएल) या कंपनीच्या ताफ्यातील सहा हजारांहून अधिक वाहनांवर ईडीने टाच आणली होती. मात्र त्यानंतर याप्रकरणी पुढे नेमकं काय झालं याची कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. (Chalak Se Malik scheme loan scam of Siddhi Vinayak Logistic Limited congress allegations on PM Modi news updates)

आता काँग्रेसने याच प्रकरणावरुन काल पत्रकार परिषद घेऊन थेट मोदी आणि सिद्धीविनायक लॉजिस्टिक्स लिमिटेड (एसव्हीएलएल) या कंपनीच्या मालकांसोबत २०१४ मधील निवडणुकीच्या प्रचारापासूनचे संबंध उघड करताना अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. त्यात बँक ऑफ महाराष्ट्र मधून मोठी कर्ज घेऊन कसा घोटाळा करण्यात आला त्याचा पाढाच काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवला.

‘चालक से मालक’ योजनेसाठी घेण्यात आलेल्या वाहनांसाठी तब्बल एक हजार ६१० कोटी रुपये कर्ज घेण्यात आलं होतं. ‘बँक ऑफ महाराष्ट्र संबंधित हा घोटाळा कसा बँकेच्या थकीत कर्जांना जवाबदार होता ते देखील सांगण्यात आलं. याप्रकरणी ‘एसव्हीएलएल’ कंपनीचा संचालक रूपचंद बैद हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करतं त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेले घनिष्ट संबंध देखील वाचून दाखविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ‘चालक से मालक’ योजनेअंतर्गत ड्रायव्हरना ट्रकखरेदीसाठीच्या कर्जाची रक्कम संचालकांनी वैयक्तिक वापरासाठी केल्याचा ठपकाही त्यांच्यावर आहे.

याच प्रकरणात ‘ईडी’ने यापूर्वी रुपचंद बैद यांना अटकदेखील केली होती. बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्जाची रक्कम हडप करण्याच्या आरोपाखाली या घोटाळ्याची व्याप्ती सुमारे ८३६ कोटी २९ लाख रुपये इतकी आहे. त्यानुसार कारवाई करून ‘ईडी’ने एकूण एक हजार ६०९ कोटी ७८ लाख रुपये किमतीच्या ६,१७० वाहनांवर टाच आणली होती. या केंद्रीय तपास यंत्रणेने जून २०१७ मध्ये याच कंपनीची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ‘आतापर्यंत केलेल्या तपासात एसव्हीएलएलने चालक से मालक योजनेअंतर्गत घेण्यात आलेले कर्ज बनावट तसेच फेरफार केलेल्या कागदपत्रांच्या आधारे तसेच कंपनीकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच ड्रायव्हरना अंधारात ठेवून त्यांच्या नावे घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर रुपचंद बैद याने ही कर्जाची रक्कम काही जवळच्या व्यक्तींमार्फत फिरवल्याचेही तपासात उघड झाले होते, असे ‘ईडी’च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते.

धक्कादायक गोष्ट म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रमधून तब्बल २३६० ट्रक गहाण दाखवून कर्ज घेण्यात आले. त्यापैकी केवळ ४९ ट्रक कायदेशीररित्या अस्तित्वात होते. मात्र कर्ज मंजूर झाल्यानंतर एसव्हीएलएलने कर्जाचे हप्ते फेडले नाहीत. बँकेकडून मिळालेली कर्जाची रक्कम एसव्हीएलएलच्या अन्य कंपन्यांमधून विनातारण कर्ज व बोगस व्यवहारांद्वारे फिरवण्यात आली. कंपनीचा प्रवर्तक रूपचंद बैद हा या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असून त्याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे हे कर्ज मिळवले आहे, असे ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. याच विषयावरून २०१४ मधील लोकसभा निवडणुकीचा दाखला देत काँग्रेसने आरोप करताना म्हटलं की, ‘बँकेच्या नोटीसला उत्तर देताना कंपनीने थेट नरेंद्र मोदी यांच्यानावाचा पत्रात उल्लेख करत बँकेवर दबाव आणला होता.

काय म्हटलं काँग्रेसने यासंदर्भात पत्रकार परिषदेत;

Mega Exposé- Special Congress Party Briefing by Pawan Khera at AICC HQ.
#ScamsterJantaParty

Posted by महाराष्ट्रनामा न्यूज on Friday, March 12, 2021

 

News English Summary: A total of Rs 1,610 crore was borrowed for vehicles taken under the ‘Chalak Se Malik’ scheme. It was also explained how the Bank of Maharashtra scam was responsible for the bank’s bad loans. Rupchand Baid, the director of SVLL, is alleged to be the mastermind behind the case and his close ties with Prime Minister Narendra Modi have also been exposed.

News English Title: Chalak Se Malik scheme loan scam of Siddhi Vinayak Logistic Limited congress allegations on PM Modi news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x