16 January 2025 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

वाढती महागाई - ढासळत्या GDP'ला प्राधान्य द्या; बाकीचं अर्थहीन राजकारण न संपणारं: चेतन भगत

Chetan Bhagat, PM Narendra Modi, Rahul Gandhi

नवी दिल्ली: देशातील महागाईने सहा वर्षातील उच्चांक गाठला आहे तर जीडीपी’ने सहा वर्षातील निच्चांक आणि हेच आकडे आपली प्राथमिकता असली पाहिजे. बाकीचं अर्थहीन राजकरण आपल्या देशात न संपणारा विषय असल्याचं सांगत लेखक चेतन भगत यांनी सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना टोला लगावला आहे. मागील महिन्यांभरापासून देशातील सत्ताधारी आणि विरोधक केवळ CAA आणि NRC;वरून राजकारण करण्यात गुंतले असल्याने सामान्यांशी निगडित असणारे मूळ विषय बाजूला पडले आहेत. त्यालाच अनुसरून लेखक चेतन भगत यांनी ट्विट केलं आहे.

सर्वसामान्यांना कांद्याच्या दराने रडवल्यानंतर भाजीपाल्यानेही गेल्या महिन्यात खिशाला कात्री लावली. डिसेंबर महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई दराचे आकडे केंद्राकडून जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये गेल्या महिन्यात महागाईचा दर ७.३५ टक्के इतका झाला आहे. खाद्य पदार्थ आणि तेलांच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर महागाई दरात ही वाढ झाली. याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये महागाई दर ५.५४ टक्के इतका होता. गेल्या वर्षी याच काळात हा दर २.१९ टक्के होता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा महागाई दर ४ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला होता. नोव्हेंबरमध्ये तीन वर्षांचा उच्चांक गाठत महागाई दर ५.५४ टक्क्यांवर पोहोचला होता. जुलै २०१६ मध्ये ग्राहक मुल्य निर्देशांक ६.०७ टक्के इतका होता.

सरकारने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या भावात वाढ झाल्याने किरकोळ चलनवाढीत मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ च्या तुलनेत मागील महिन्यात अन्नधान्यांच्या भावात १४.१२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये ती उणे २.६५ होती. भाजीपाल्याच्या भावात तब्बल ६०.५ टक्‍क्‍यांनी वाढ झाल्यामुळे चलनवाढीत वाढ झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या जुलै २०१६च्या महागाई दराच्या धोरणानुसार, किमान आणि कमाल दर २ ते ६ टक्‍क्‍यांदरम्यान असणे अपेक्षित आहे. डिसेंबरमध्ये त्यात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत किरकोळ चलनवाढीचा दर जास्त राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त करून तो ४.७ ते ५.१ टक्‍क्‍यांदरम्यान राहील, असे म्हटले होते. डिसेंबर २०१९च्या किरकोळ चलनवाढीने रिझर्व्ह बॅंकेचे अंदाज खोटे ठरविले आहेत.

त्यात भाजीपाल्यांची दरवाढ थांबत नाही तोच आता साखर महागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या दरवाढीचे शुक्लकाष्ठ काही संपलेले नाही. त्यामुळे ग्राहकराजा पुरता चिंतेत असून, अचानकपणे झालेल्या साखरेच्या दरातील वाढ सणासुदीचा काळ कटू करणार की काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.

त्यात ढासळत्या अर्थव्यवस्थेला दिलासादायी क्षण नसल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सलग ३ महिन्यांच्या घसरणीनंतर नोव्हेंबर २०१९ मधील औद्योगिक उत्पादन वाढीचा दर वधारला आहे. मंदीने बेजार अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत देणारा हा महत्वाचा दिलासा आहे. निर्मिती क्षेत्राच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन निर्देशांक या महिन्यात १.८ टक्के नोंदला गेला आहे.

 

Web Title:  Chetan Bhagat slams Modi government over high inflation and GDP Slowdown.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x