भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक | केंद्राची माहिती

नवी दिल्ली, १६ सप्टेंबर : भारतामधील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०२० दरम्यान चीनने एक अरब डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) केली आहे. सरकारनेच जारी केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे. राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली आहे. यासंदर्भातील वृत्त आयएएनएस वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
भारतीय कंपन्यांमध्ये त्यातही स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे, हा दावा खरा आहे का असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला होता. या प्रश्नाला सरकारकडून देण्यात आलेल्या लेखी उत्तरामध्ये भारतातील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये चिनी गुंतवणूक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल 2016 ते मार्च 2020 या कालावधीत 1,600हून अधिक कंपन्यांना चीनकडून 102 कोटी 2.5 लाख डॉलर (सुमारे 7500 कोटी) थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) मिळाली.
या कंपन्या 46 क्षेत्रातील आहेत. यापैकी ऑटोमोबाईल उद्योगातील कंपन्या, पुस्तकांचे प्रिंटिंग (लिथो प्रिंटिंग उद्योगासह), इलेक्ट्रॉनिक्स, सेवा आणि विद्युत उपकरणांच्या कंपन्यांना या काळात चीनकडून 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त एफडीआय प्राप्त झाला. आकडेवारीवरून असे दिसून येत की, ऑटोमोबाईल उद्योगाला चीनकडून सर्वाधिक 172 दशलक्ष डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक मिळाली. सेवा क्षेत्राला 13.96 दशलक्ष डॉलर्सची परदेशी गुंतवणूक मिळाली. राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय चिनी एजन्सींनी केलेल्या गुंतवणुकीची माहिती ठेवत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
एअर इंडियाला खरेदीदार न मिळाल्यास कायमची बंद करणार | मोदी सरकारची माहिती
इनकमिंग सुरूच | अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
News English Summary: Between April 2016 and March 2020, China made अरब 1 billion in foreign direct investment (FDI) in more than 1,600 companies in India. This information has come to light from the statistics released by the government itself. The government has given this information in a written reply to a question in the Rajya Sabha.
News English Title: China Investments In India Over 1600 Indian Companies one Billion US Dollar In FDI In Four Years Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल