17 January 2025 7:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, - NSE: JIOFIN HFCL Share Price | HFCL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीत रिलायन्सची हिस्सेदार - NSE: HFCL
x

चिनी कंपनीची महाराष्ट्रात ७६०० कोटींची गुंतवणूक

China Great Wall, Signs MoU, Maharashtra Investment

मुंबई, १७ जून : लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

दरम्यान, चीनमधील आघाडीची कार उत्पादन कंपनी ‘ग्रेट वॉल मोटर्सने’ (GWM) मंगळवारी महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केल्याचे जाहीर केले. यानुसार कंपनी तब्बल 1 बिलियन डॉलरची (जवळपास 7600 कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे.

ग्रेट वॉल मोटर्स कंपनीचे भारतातील सहाय्यक संचालक पार्कर शी म्हणाले की, आम्ही महाराष्ट्र सरकारने या गुंतवणुकीचं समर्थन आणि प्रोजेक्टसाठी सहाय्य केल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. एकूण मिळून आम्ही भारतात १ अरब अमेरिकन डॉलर गुंतवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यामुळे जागतिक स्तरावर उत्पादन, रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट केंद्राचं निर्माण, आयात-निर्यात प्रक्रिया यामुळे ३ हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार देण्याची आमची तयारी आहे.

“हा एक अत्याधुनिक रोबोटिक्स तंत्रज्ञानासह उत्पादन घेता येणारा एक स्वयंचलित प्रकल्प असेल. एकूणच आम्ही टप्प्याटप्प्याने भारतात अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास वचनबद्ध आहोत. या प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाच्या प्रीमियम प्रोडक्ट्सचे उत्पादन, आर अँड डी सेंटर, पुरवठा साखळी तयार करणे आणि टप्प्याटप्प्याने 3 हजारांहून अधिक जणांना रोजगार उपलब्ध केला जाईल”, अशी माहिती जीडब्ल्यूएमच्या भारतीय सहाय्यक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पार्कर शी यांनी सांगितले.

 

News English Summary: Great Wall Motors (GWM), a leading car manufacturer in China, on Tuesday announced a Memorandum of Understanding (MoU) with the state government to start manufacturing in Maharashtra. According to him, the company will invest तब्बल 1 billion (about Rs 7,600 crore).

News English Title: Chinas Great Wall Motor Signs Mou With Maharashtra To Invest 1 Billion Create Jobs In Maharashtra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x