22 November 2024 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर आठवड्याभरात दुप्पट, शहरी भागातील बेरोजगारीत ११.७२ टक्क्यांची वाढ - CMIE अहवाल

India corona pandemic

नवी दिल्ली, १९ मे | देशभरामध्ये कोरोनाची परिस्थती गंभीर बनत चालली आहे.कोरोना रूग्णांसोबतच मृत्यूचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगभरातून मोदींवर टिका केली जात आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनचे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळाले होते. आता पुन्हा दुसरी लाट आल्याने अनेक राज्यांमध्ये कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. तर लाखो लोकांचे कोरोनामुळे प्राण गेल्याने भीतीच वातावरण असून लोकं घरातच बसणं पसंत करत आहेत.

परिणामी बेरोजगारीचा दर पुन्हा एकदा एक वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. त्यामुळे देशपातळीवर मोदी सरकारच्या अडचणी प्रचंड प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. सीएमआयई’ने यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर प्रसिद्ध केला आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनं (सीएमआयई) जारी केलेल्या अहवालानुसार, १६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर गेल्या आठवड्यात दुपटीने वाढून १४.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर ७.२९ टक्के होता. तर यादरम्यान शहरी भागात बेरोजगारीचा दरही ११.७२ टक्क्यांवरून वाढून १४.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तरी दुसरीकडे गेल्या वर्षी जून महिन्यात ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर विक्रमी १७.५१ टक्क्यांवर पोहोचला होता. गावांमध्ये सध्या बेरोजगारी वाढल्यानं १७ मे पर्यंत मनरेगा अंतर्गत ४.८८ कोटी लोकांनी रोजगार मागितला होता. यापैकी ४.२९ कोटी लोकांना रोजगार मिळाला. परंतु यापैकी ३.१४ कोटी लोकंच काम करण्यासाठी आले. यावर संसर्गाच्या भीतीनं कामगार कामासाठी बाहेर पडत नसल्याचंही दिसून येत आहे.

 

News English Summary: As a result, the unemployment rate has once again reached a one-year high. Therefore, at the national level, the problems of the Modi government are likely to increase tremendously. CMIE has released a detailed report in this regard.

News English Title: CMIE report over unemployment increased in India this year news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x