17 January 2025 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL Bank Clerk Recruitment | तरुणांसाठी सुवर्ण संधी, सरकारी बँकेत PO आणि क्लार्क पदांसाठी भरती, मोठ्या पगाराची संधी सोडू नका Tata Punch on Road Price | 1 लाखांच्या डाऊन पेमेंटवर 'टाटा पंच' तुमची, महिन्याला भरावी लागणारी EMI ची किंमत पहा Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा PPF Investment Formula | PPF मध्ये फक्त पैसे गुंतवू नका, या फॉर्म्युल्याने PPF बचत करा, मिळेल करोडमध्ये परतावा SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI म्युच्युअल फंडात 500 रुपयांची गुंतवणूक सुरु करा, मिळेल 35 लाख रुपये परतावा Post Office Scheme | 100, 500, 1000 आणि 2000 रुपयांच्या पोस्ट ऑफिस RD गुंतवणुकीतून किती परतावा मिळेल, रक्कम इथे पहा
x

MSME क्षेत्राला कोणत्याही गॅरंटीशिवाय ३ लाख कोटींचं कर्ज - निर्मला सीतारामन

नवी दिल्ली, १३ मे: स्क्षूम, लघु, मध्यम कुटीर उद्योगांसाठी तीन लाख कोटीचे कर्ज देण्यात येईल. त्यासाठी कुठल्याही गॅरटीची आवश्यकता नाही. ४५ लाख MSME उद्योगांना याचा फायदा होईल. एक वर्ष कर्जाचा हप्ता भरण्याची गरज नाही.

संकटात अडकलेल्या दोन लाख MSME ला कर्जासाठी २० हजार कोटी रुपयांची मदत केली जाईल. एमएसएमईला एका वर्षापर्यंत कर्जाचे हफ्ते (EMI) भरण्यापासून सूट मिळेल. तसेच २५०० कोटीपर्यंतच्या लघु, लघु आणि मध्यम उद्योगांना याचा फायदा मिळेल. लघु, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राला ३ लाख कोटी रुपयांचं कर्ज कोणत्याही गॅरंटीशिवाय देण्यात येईल. यामुळे ४५ लाख एमएसएमईला याचा फायदा होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे कुटीर लघुउद्योगांसाठी अशी सहा पावलं उचणार आहोत. यातील दोन ईपीएफसाठी, एनबीएफसीशी निगडीत दोन निर्णय आणि एक निर्णय एमएफयामुळे ४५ लाख एमएसएमईला याचा फायदा होईल.आयशी निगडीत आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं.

देशाच्या विकासासाठी हे पॅकेज आहे. देशातील गरीब, स्थलांतरीत लोकांसाठी डीबीटी एक चांगली सोय ठरली आहे. त्यांना थेट मदत मिळत आहे. लोकल ब्रँडना ग्लोबल बनविण्यात येणार आहे. अनेक अधिकारी, तज्ज्ञ, मंत्रालयांशी पंतप्रधानांनी चर्चा करून ही योजना घोषित केली आहे. १७५ गिगावॉट सोलार एनर्जी, जनधन सारख्या योजना स्वावलंबी बनण्यासाठी पाया ठरणार आहेत, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. जमीन, कामगार, रोखता आणि कायदे या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, असेही सीतारामन यांनी सांगितले.

 

News English Summary: Rs 20,000 crore will be provided for loans to two lakh MSMEs in crisis. MSMEs will be exempted from paying loan installment (EMI) for up to one year. It will also benefit small, medium and medium enterprises up to Rs 2,500 crore. A loan of Rs 3 lakh crore will be given to the Small, Medium Enterprises (MSMEs) sector without any guarantee. This will benefit 45 lakh MSMEs, said Finance Minister Nirmala Sitharaman.

News English Title: Collateral Free Automatic Loans To Msmes Worth Rs3 Lakh Crore Says Fm Nirmala Sitharaman News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x