19 April 2025 9:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

आम्ही तेल प्रकल्प उभारले | सात वर्षात तुम्ही काय केलं जाहीरपणे सांगा - काँग्रेस

Congress, Pruthviraj Chavan, Modi government, high fuel rates

सातारा, २० फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. देशातील काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तर काही राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल लवकरच शंभरी पार करेल. पेट्रोल, डिझेलच्या किमती सातत्यानं वाढत असल्यानं सामान्य नागरिक अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत.

मुंबईत पेट्रोलने ९६.६२ रुपयांची पातळी गाठली. गुरुवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल दरात ३४ पैसे आणि डिझेलमध्ये ३२ पैसे वाढ केली होती. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना आता ८७.६७ रुपये मोजावे लागतील. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक ९८ रुपये आहे.

दरम्यान, सर्व बाजूने टीका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या वाढत्या दरांसाठी आधीच्या सरकारांना जबाबदार ठरवलं होतं. मोदींच्या या टीकेवरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर पलटवार केला. “मागील सरकारने कमीतकमी देशातंर्गत तेल प्रकल्प तरी उभारले. तुम्ही सात वर्षांत काय केले ते सांगा,” असा सवाल चव्हाण यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची दरवाढ होत आहे. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यात केंद्र सरकार धन्यता मानत आहे, अशी टीका पृथ्वाराज चव्हाण यांनी केली.

देशाच्या मागणीच्या तुलनेत ८५ टक्के तेल आयात करावे लागत आहे. या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्‍चित होते. चुकीच्या कररचनेमुळे आणि केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे देशवासीयांना पेट्रोल, डिझेल महाग मिळत आहे. आधीच्या सरकारांनी देशातील साठ्यांचा शोध घेत तेल प्रकल्प उभारले आहेत. तुम्ही सात वर्षांत कोणते प्रकल्प उभारले ते जाहीरपणे सांगा. करोना काळातील मदतीचे फुगीर आकडे सांगत सर्वसामान्यांना लुटायचे काम सुरू आहे,” अशा शब्दात चव्हाण यांनी मोदींवर निशाणा साधला.

 

News English Summary: It has to import 85 per cent of the country’s demand. The price of this oil is determined internationally. Due to wrong tax structure and stubbornness of the central government, petrol and diesel are getting more expensive for the people. Previous governments have set up oil projects to explore the country’s reserves. State openly what projects you have built in seven years. The common man is being robbed by telling the fugitive figures of the Corona era, ”Pruthviraj Chavan said, targeting Modi government.

News English Title: Congress leader Pruthviraj Chavan slams Modi government over high fuel rates news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या