17 April 2025 4:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

मोदींच्या खास मित्रांचा विकासासाठी | सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करुन रोजगार नष्ट - राहुल गांधी

Congress Leader Rahul Gandhi, Modi Government, Privatization Issue, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ७ सप्टेंबर : खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देश मोदी सरकारने निर्माण केलेली अनेक संकटं आज झेलत आहे. त्यापैकीच गरजेचं नसलेलं खासगीकरण आहे, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

देशातल्या तरुणाला नोकरी हवी आहे, पण मोदी सरकार सरकारी कंपन्यांचं खासगीकरण करुन रोजगार आणि ठेवी भांडवल नष्ट करत आहे. फायदा कोणाचा? फक्त मोदींच्या खास मित्रांचा विकास करण्यासाठी हे होत आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. खासगीकरण थांबवा आणि सरकारी नोकऱ्या वाचवा, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

६ तारखेलाच त्यांनी जीडीपीच्या घसरणीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. जीडीपीच्या घसरणीचं मोठं कारण म्हणजे जीएसटी असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आता त्यापाठोपाठ खासगीकरणावरुनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. एवढंच नाही तर करोना संकटावरुनही त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. मोदी सरकार प्रत्येक संकटाचं उत्तर शोधण्याऐवजी शहामृगासारखं तिथून पळ काढतं. प्रत्येक चुकीच्या स्पर्धेत देश पुढे गेला आहे. मग ते करोना बाधितांची संख्या असो किंवा जीडीपीची घसरण अशा आशयाचंही एक ट्विट करुन त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर ताशेरे झाडले आहेत. तसंच आता खासगीकरणावरुनही त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

 

News English Summary: The Modi government is destroying employment and deposit capital by privatizing state-owned companies. Who benefits? Rahul Gandhi has alleged that this is happening only to develop Modi’s special friends. Rahul Gandhi has demanded to stop privatization and save government jobs.

News English Title: Congress Leader Rahul Gandhi Criticized Modi Government On Privatization Issue Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या