24 December 2024 11:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS NMDC Share Price | मल्टिबॅगर NMDC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NMDC Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, 1 आठवड्यात 43% कमाई, यापूर्वी 714% परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO Watch | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड फक्त 52 रुपये, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP
x

फ्रान्समध्ये राफेल कराराची चौकशी | राहुल गांधींनी 'चोर की दाढी' एवढे ३ शब्दच ट्वीट केले

Rafael Deal

नवी दिल्ली, ०३ जुलै | फ्रान्समध्ये राफेल करारावरून चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका न्यायाधिशाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे फ्रान्सच्या पीएनएफने (पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेज) सांगितले आहे. त्यामुळे आता फ्रान्सच्या आजी माजी पंतप्रधानांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. फ्रेंच माध्यमाच्या माहितीनुसार, या करारात भ्रष्ट्राचारावितिरिक्त पक्षपात करण्याच्या आरोपांचीदेखील चौकशी करण्यात येणार असल्याचे पीएनपीने म्हटले आहे.

फ्रेंच एनजीओ शेरपाने केली होती तक्रार:
संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी फ्रेंच एनजीओ शेरपाने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मीडियापार्ट संबंधित प्रकरणावर सलग अहवाल प्रसिद्ध केला होता. परंतु, पब्लिक प्रॉसिक्यूशन सर्विसेजने चौकशीच्या मागणीला फेटाळून लावले होते.

दरम्यान, भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये ३६ राफेल फायटर जेटच्या झालेल्या व्यवहाराची आता फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आपल्या ट्वीटर अकाउंटवरून राहुल गांधी यांनी “चोर की दाढी…” एवढे तीन शब्दच ट्वीट केले आहेत. याशिवाय, या ट्वीटमध्ये राहुल गांधींनी #RafaleScam असा हॅशटॅग देखील राहुल गांधींनी दिला आहे. त्यामुळे या ट्वीटच्या माध्यमातून राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधल्यामुळे आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यामध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress leader Rahul Gandhi Mocks PM Narendra Modi France Judicial Inquiry On Mediapart Report Rafael Deal Scam news updates.

हॅशटॅग्स

#RafaelDeal(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x