जस जशी मोदींची दाढी वाढत गेली | तस तसा GDP घसरत गेला | काँग्रेस नेत्याकडून ग्राफिक
मुंबई, ०३ मार्च: कोरोना व्हायरसशी दोन हात करताना आर्थिक आघाड्यांवर घेतलेल्या निर्णयाने अर्थचक्राला चालना देण्यात केंद्र सरकारला काही प्रमाणात यश आले असले तरी २०२० मधील दुसऱ्या तिमाहीपासूनचे विकासदराचे आकडे चिंताजनक होते. २०२० मध्ये ३० सप्टेंबर रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत विकास दर (GDP) उणे ७.५ टक्के इतका राहिला होता. तर एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपीने ऐतिहासिक उणे २३.९ टक्क्यांचा स्तर गाठला होता.
2020-21 या आर्थिक वर्षातल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीचे आकडे (India Q2 GDP Data Release) मोदी सरकारने जाहीर केले होते. चालू आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाहीत GDP 7.5 टक्क्यांवर आला आहे. या तिमाहीच्या अंदाजाप्रमाणे किमान 8 टक्क्यांच्या वर तरी हा रेट असायला हवा होता. प्रत्यक्षात तो आणखी कमी झाल्याचं निदर्शनास आलं आहे. पहिल्या तिमाहीतच ऐतिहासिक अशी 23.9 टक्क्यांची घट GDP मध्ये झाली होती. Coronavirus च्या साथीच्या संकटामुळे उद्योग-धंदे बंद होते. त्यामुळे हे चित्र होतं. आता दुसऱ्या तिमाहीकडून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात जाहीर झालेले आकडे पाहता, पुढे देखील अर्थव्यवस्था गटांगळ्या खात असल्याचं स्पष्ट झाले होते. ही पडझड कायम राहिली तर भयंकर मंदीची लाट येऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी मोदींच्या वाढणाऱ्या दाढीचा संदर्भ कोसळणाऱ्या GDP सोबत जोडून पंतप्रधानांची खिल्ली उडवणारी एक ग्राफिक शेअर केली आहे. शशी थरूर यांनी एका ग्राफिकसोबत त्यांचे हे फोटो शेअर केले आहेत. २०१७-१८ च्या चौथ्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी ८.१ टक्के होता. जो २०१९-२० च्या दुसऱ्या तिमाहीत ४.५ टक्के राहिला. यालाच ग्राफिक्स इलस्ट्रेशनचा अर्थ म्हणतात असं कॅप्शनही त्यांनी याला दिलं आहे. पुढील काळात देशाच्या जीडीपीमध्ये सकारात्मक वाढ होऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूच्या महासाथीमुळे जीडीपीमध्ये घसरण झाली होती.
This is what is meant by a “graphic illustration”! pic.twitter.com/QYyA2lN2W0
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) March 2, 2021
News English Summary: Congress leader Shashi Tharoor has shared a graphic mockery of the Prime Minister by linking Modi’s growing beard with collapsing GDP. Shashi Tharoor shared these photos with a graphic. In the fourth quarter of 2017-18, India’s GDP was 8.1 per cent. Which stood at 4.5 per cent in the second quarter of 2019-20.
News English Title: Congress leader Shashi Tharoor has shared a graphic mockery of the Prime Minister by linking Modi growing beard with collapsing GDP news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया
- Dhananjay Powar | बिग बॉस फेम धनंजय पोवार देतोय बिग बॉसमध्ये जाण्यासाठी ट्रेनिंग, गमतीशीर व्हिडिओ झालाय व्हायरल