4 January 2025 3:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

मोदी-शहांनी स्वतः क्लीनचिट दिलेल्या या नेत्यांना CBI, ED आणि आयकर विभाग अटक करणार नाहीत - काँग्रेस

बंगळुरू, १८ मे | पश्चिम बंगालच्या नारदा प्रकरणात पुन्हा एकदा केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) ने तपास सुरू केला आहे. सीबीआयने सोमवारी अनेक ठिकाणी छापेमारी केली. यानंतर ममता सरकारमधील मंत्री फिरहाद हाकिम, सुब्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा आणि माजी महापौर शोवन चॅटर्जी यांची चौकशी करुन सर्वांना अटक करण्यात आले. त्यानंतर या सर्वांना कोर्टात हजर केले केले होते.

या कारवाईदरम्यान पुन्हा एकदा केंद्र आणि बंगाल सरकार आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. आपल्या मंत्र्यांच्या चौकशीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआयच्या कार्यालयात दाखल झाल्या होत्या आणि तब्बल ८ तास ठाण मांडून होत्या.

दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आणि स्ट्रिंग ऑपरेशन करणारे पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्न थेट टीएमसीतुन भाजपात गेलेल्या सध्या प. बंगालमध्ये विरोधीपक्षनेते असलेल्या सुवेंदु अधिकारी यांच्या बाबतीत केला आहे. सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? तसेच लाच घेतल्याचे आरोप मुकुल रॉय यांच्याबाबतीतही असल्याने त्यांच्यावरील कारवाईचं काय, असा थेट प्रश्न त्यांनी ऑन रेकॉर्ड उपस्थित केल्याने भाजपच्या देखील अडचणी वाढण्याची दाट शक्यता होती. मात्र सुवेंदु अधिकारी आणि मुकुल रॉय हे आता भाजपमध्ये गेल्याने त्यांना क्लीनचिट मिळाल्यात जमा आहे. यापूर्वी देखील अनेक नेते अशा कारवाईपासून वाचवले गेले आहेत. सुवेंदु अधिकारी, मुकुल रॉय यांच्या व्यतिरिक्त येदुइरप्पा, रेड्डी बंधू, हिमंत शर्मा आणि नारायण राणे हे देखील अशाच प्रकारच्या कारवाईतून वाचवले गेल्याचा आरोप झाला आहे. काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी यासंदर्भात ट्विट करताना भाजपवर प्रहार केला आहे.

 

News English Summary: CBI, IT and ED will never arrest these leaders as their clean chits have been personally cleared by Modi & Shah. They have been rinsed & cleaned in BJP’s Operation Kamala Washing Machine said congress leader Srivatsa.

News English Title: Congress leader Srivatsa slams BJP over CBI raid in West Bengal on TMC leader news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x