15 January 2025 7:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

साहेब ६० वर्षांपूर्वी पंतप्रधान झाले असते | तर आज खोदकामात बँकांचे अवशेष सापडले असते

Congress MLA Bhai Jagtap, Modi government, Banking sector condition

मुंबई, २२ नोव्हेंबर: देशातील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये वाढते घोटाळे आणि वाढत्या एनपीए’मुळे बँकांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक वळणावर आहे. दुसरीकडे मंदीने अर्थव्यवस्थेला चांगेलच हैराण केले असून RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नजीकच्या काळात आर्थिक स्थिती आणखी बिकट आणि आव्हानात्मक होईल, असा इशारा दिला होता. त्यामुळं येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी बँकांनी सुसज्ज राहावे, असा सल्ला दास यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांना दिला होता.

मंदीचा वाढत दबाव पाहता ‘आरबीआय’ने जीडीपी दराचा अंदाज ५ टक्के केला आहे. दुसऱ्या तिमाहीत प्रत्यक्ष जीडीपी ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आला असून तो आणखी घसरण्याची शक्यता बड्या संस्थांनी व्यक्त केली आहे. RBI ने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं होतं. त्यामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचं सांगण्यात आलंय. बँकांना तातडीने थकीत कर्ज कमी करण्याचा सल्ला यामध्ये देण्यात आलाय. सध्या देशातील बँकिंग व्यवस्था मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं देखील आरबीआयने सांगितलं होतं.

मोदी सरकारने अनेक राष्ट्रीयकृत बँकांचे मर्जींग देखील सुरु केलं आहे आणि त्यामुळे बँकिंग व्यवस्थेचा अंदाज येऊ शकतो. दरम्यान, याच विषयाला अनुसरून काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख न करता टोला लगावला आहे. याबाबत ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, ‘साहेब ५०-६० वर्ष पूर्वी पंतप्रधान झाले असते, तर आज खोदकामात बँकांचे अवशेष सापडले असते.’

 

News English Summary: The Modi government has also started merging a number of nationalized banks, which could give a boost to the banking system. Meanwhile, Congress MLA Bhai Jagtap has raised the issue without mentioning Prime Minister Modi. Tweeting about this, he said, “If Saheb had become the Prime Minister 50-60 years ago, the remains of banks would have been found in the excavations today.”

News English Title: Congress MLA Bhai Jagtap criticized Modi government over Banking sector condition news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x