18 January 2025 4:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

मोदींनी स्वतःच आर्थिक अराजक निर्माण केलं | आता भरपाईसाठी देशाची संपत्ती विकत आहेत

Congress MP Rahul Gandhi, PM Narendra Modi, Policies, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, 08 सप्टेंबर : देशात निर्माण झालेल्या आर्थिक गर्तेतून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर दिला असून, तब्बल २६ कंपन्यांचं खासगीकरण करण्याच्या दिशेनं पावलं टाकली आहेत. यातील २३ कंपन्यांना केंद्रानं मंजूरी दिली आहे. त्यातच आता भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीतील सरकारची २५ टक्के भागीदारी विकणार असल्याचं वृत्त आहे. या वृत्तानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे.

“मोदीजी, सरकारी कंपनी विका मोहीम चालवत आहेत. स्वतःच निर्माण केलेल्या आर्थिक अरिष्टाची भरपाई करण्यासाठी देशाची संपत्ती थोडी थोडी करून विकली जात आहे. जनतेचं भविष्य आणि विश्वास बाजूला ठेवून एलआयसीला विकणं मोदी सरकारचा आणखी एक लज्जास्पद प्रयत्न आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

दरम्यान, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा IPO आणण्याच्या प्रक्रियेला सरकारने वेग दिला आहे. पण शेअर बाजारात त्याची लिस्टिंग वेगळी असू शकते. सीएनबीसी आवाजला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील सरकारी विमा कंपनी LICचा आयपीओ आतापर्यंतचा भारताचा सर्वात मोठा आयपीओ असल्याचे सिद्ध होऊ शकते.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा 25 टक्के हिस्सा विकण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून सरकार किरकोळ गुंतवणूकदारांना बोनस आणि सवलत देण्यावर विचार करीत आहे. वित्तीय सेवा विभागाने LICमधील भागभांडवल विक्रीचा आराखडा तयार केला असून तो सेबी, आयआरडीए आणि एनआयटीआय आयोगासह संबंधित मंत्रालयांना पाठविला आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी माहिती असलेल्या एकानं सांगितले की, कंपनीला भागभांडवल 100 टक्क्यांवरून 75 टक्क्यांपर्यंत कमी करावयाचे आहे.

 

News English Summary: The country’s wealth is being sold little by little to offset the economic woes it has created. It is another shameful attempt of the Modi government to sell LIC, leaving aside the future and trust of the people, ”said Rahul Gandhi.

News English Title: Congress MP Rahul Gandhi Attacks Prime Minister Narendra Modi government policies Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x