23 November 2024 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

५ वर्ष सत्ता द्या म्हणत मोदींनी केवळ ७ वर्षात जनतेचे जगणे मुश्कील केलंय | इंधना दरवाढीतून २५ लाख कोटी कमावले - काँग्रेस

Mallikarjun Kharge

मुंबई, १३ जुलै | काँग्रेस पक्षाला ७० वर्षे सत्ता दिली मला फक्त ५ वर्ष सत्ता द्या म्हणून सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदींनी अवघ्या ७ वर्षात देशातील जनतेचे जगणे मुश्कील करुन ठेवले आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाच्या किमती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेल्या असून मोदी सरकारने इंधनाच्या करातून २५ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा पैसा देशातील जनतेच्या हितासाठी किंवा राज्य सरकारसाठी वापरला जात नाही, असा आरोप करून १९ तारखेपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनात मोदी सरकारला इंधन दरवाढ व महागाईप्रश्नी जाब विचारु, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटले आहे.

मोदी सरकार ‘हम दो हमारे दो’ चे सरकार
डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात २७.१ कोटी लोकांना गरिबी रेषेच्यावर आणले होते. मात्र मागील वर्षी २३ कोटी लोक गरिब रेषेच्या खाली ढकलेले गेले आहेत. युपीए सरकारने १० वर्षात कमावलेले सर्व काही अवघ्या एका वर्षात मोदी सरकारने घालवले. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ९७ टक्के कुटुंबाचे उत्पन्न घटले आहे. युपीएचे सरकार असताना मनरेगा, शिक्षण हक्क कायदा, अन्न सुरक्षा कायदा याच्या माध्यमातून सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला होता. पण मोदी सरकारने सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, महागाईचा बोजा टाकून कार्पोरेट टॅक्समध्ये मात्र वारंवार सवलत दिली जात आहे. मोदी सरकार ‘हम दो हमारे दो’ चे सरकार आहे.

विश्व गुरु होण्यास निघालेल्या मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे:
डिझेलचे दर वाढल्याने शेतकऱ्यांवर त्याचा थेट परिणाम होतो. शेतीच्या साहित्यावरही जीएसटी आकारला जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यालाच रस्त्यावर आणले आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर असलेले तीन कृषी कायदे रद्द कारावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर ७ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत पण मोदी सरकार कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाही. विश्व गुरु होण्यास निघालेल्या मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे नंतर विश्वगुरुचे पाहु, असेही खर्गे म्हणाले.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Congress opposition leader Mallikarjun Kharge criticism of Modi government over inflation news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x