18 April 2025 12:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

'एक्झिट पोल'खेळ: झटपट शेअर मार्केट नफा; पण निकाल वेगळेच असतील आणि ही आहे रणनीती

Narendra Modi, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी एवघा केवळ दिवस शिल्लक आहे. लोकसभेसाठी शेवटच्या म्हणजे ७व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि देशभरातील टीव्ही वृत्त वाहिन्यांनी एकप्रकारे पैसे घेऊन ‘एक्झिट पोल’खेळ केल्याचं अनेक तज्ज्ञांशी संपर्क साधल्यावर समोर येत आहे. कारण यामागे देखील ४-५ दिवसात शेअर बाजारातून मोठा नफा कमावून स्वतःच भांडवली मूल्य वाढवणे, इंट्रा-डे शेअर खरेदी विक्रीतून ४-५ दिवस बक्कळ नफा कमावणे आणि एक कोणालाही न समजणारी राजकीय गणितं आखणे असं सिद्ध होतं आहे. कारण मुळात देशात मोदी लाट नसताना देखील जे चित्र अचानक एका दिवसात उभं केलं गेलं आहे त्यामागे देखील मोठं षडयंत्र आहे, ज्यामध्ये विरोधक अडकल्याचे दिसत आहे. कारण निकाल देखील ‘एक्झिट पोल’खेळच्या वेगळेच लागणार आहेत हे दुसरं सत्य आहे.

कारण निवडणुकीसंदर्भात आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळणार आहे. एक्झिट पोलमुळे विरोधकांना धडकी भरली आहे. तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गोटात आनंदोत्सव सुरू झाला आहे. परंतु एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आलेल्या निकालांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. तसेच अनेक गोष्टी साध्य करण्यासाठी एक्झिट पोलचा वापर सुरू असल्याची शक्यता विविध पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

मागील २-३ दिवसातील विरोधकांमधील गोंधळ पाहिल्यास ती रणनीती सत्यात उतरल्याचे दिसेल. कारण एक्झिट पोलमुळे विरोधकांच्या मोर्चेबांधणीची गती मंदावली आहे. त्यात युपीए मधील घटक देखील संभ्रमात आहेत आणि विरोधातील इतर पक्ष देखील भाजपच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे निवडणुकीचा निकाल एक्झिट पोलच्या विपरीत लागल्यास विरोधकांना हालचालींना वेळ मिळणार नाही. तर एक्झिट पोलच्या आडून इतर गोष्टी साध्य करण्याची उठाठेव सुरू असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदी सरकारकडून इव्हीएममध्ये काही तरी घोळ करण्यात येणार आहे. त्यासाठी एक्झिट पोलच्या माध्यमातून तसं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर २२ विरोधी पक्षांनी प्रत्येक विधानसभा मतदार संघात ५० टक्के व्हीव्हीपॅट पावत्यांची मागणी केली आहे.

तसेच शेअर मार्केटसाठी देखील एक्झिट पोलचा पर्याय शोधण्यात आला असेल, असा दावा करण्यात येत आहे. एक्झिट पोल आल्यानंतर शेअर बाजाराने अचानक मुसंडी मारली. त्यामुळे एक्झिट पोलचा वापर शेअर मार्केटमधून पैसा काढण्यासाठी करण्यात येत असल्याचा दावा विरोधक करत आहेत. तर अनेकांनी एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांना मॅनेज केल्याचा दावा केला आहे. पैशांच्या मोबदल्यात एक्झिट पोलचा निकाल बदलल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या