५ वर्षांत महागाईचा उच्चांक! मोदी सरकारच्या काळात सामान्यांचा खिसा खाली
नवी दिल्ली: सर्वसामान्यांना कांद्याच्या दराने रडवल्यानंतर भाजीपाल्यानेही गेल्या महिन्यात खिशाला कात्री लावली. डिसेंबर महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई दराचे आकडे केंद्राकडून जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये गेल्या महिन्यात महागाईचा दर ७.३५ टक्के इतका झाला आहे. खाद्य पदार्थ आणि तेलांच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर महागाई दरात ही वाढ झाली. याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये महागाई दर ५.५४ टक्के इतका होता. गेल्या वर्षी याच काळात हा दर २.१९ टक्के होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा महागाई दर ४ टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला होता. नोव्हेंबरमध्ये तीन वर्षांचा उच्चांक गाठत महागाई दर ५.५४ टक्क्यांवर पोहोचला होता. जुलै २०१६ मध्ये ग्राहक मुल्य निर्देशांक ६.०७ टक्के इतका होता.
सरकारने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या भावात वाढ झाल्याने किरकोळ चलनवाढीत मोठी वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ च्या तुलनेत मागील महिन्यात अन्नधान्यांच्या भावात १४.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये ती उणे २.६५ होती. भाजीपाल्याच्या भावात तब्बल ६०.५ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे चलनवाढीत वाढ झाली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या जुलै २०१६च्या महागाई दराच्या धोरणानुसार, किमान आणि कमाल दर २ ते ६ टक्क्यांदरम्यान असणे अपेक्षित आहे. डिसेंबरमध्ये त्यात वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीत किरकोळ चलनवाढीचा दर जास्त राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त करून तो ४.७ ते ५.१ टक्क्यांदरम्यान राहील, असे म्हटले होते. डिसेंबर २०१९च्या किरकोळ चलनवाढीने रिझर्व्ह बॅंकेचे अंदाज खोटे ठरविले आहेत.
त्यात भाजीपाल्यांची दरवाढ थांबत नाही तोच आता साखर महागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या दरवाढीचे शुक्लकाष्ठ काही संपलेले नाही. त्यामुळे ग्राहकराजा पुरता चिंतेत असून, अचानकपणे झालेल्या साखरेच्या दरातील वाढ सणासुदीचा काळ कटू करणार की काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.
त्यात ढासळत्या अर्थव्यवस्थेला दिलासादायी क्षण नसल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सलग ३ महिन्यांच्या घसरणीनंतर नोव्हेंबर २०१९ मधील औद्योगिक उत्पादन वाढीचा दर वधारला आहे. मंदीने बेजार अर्थव्यवस्थेत सुधारणेचे संकेत देणारा हा महत्वाचा दिलासा आहे. निर्मिती क्षेत्राच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन निर्देशांक या महिन्यात १.८ टक्के नोंदला गेला आहे.
Web Title: Consumer Price Index OR CPI crosses Limit More than 7 percent in December 2019.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Mutual Fund SIP | गुंतवणुकीचा जबरदस्त फॉर्मुला, झपाट्याने पैसा वाढवा, करोडमध्ये मिळेल परतावा, फायदा घ्या - Marathi News