5 November 2024 10:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

देशातील १२ टक्के स्टार्टअप बंद, तर ७०% स्टार्टअपची आर्थिकस्थिती बिकट

Coronavirus Effect, India Startups Facing Problem

मुंबई, ६ जुलै : टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन मागे घेणं ही भारतीय कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मत आहे. यापूर्वी काही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन हळूहळू मागे घेतल्यामुळे कंपन्यांसमोर नवी आव्हाने उभी राहणार आहेत. दुसरीकडे, भारतीय उद्योगपती आणि आयटी व्यावसायिकांचे केंद्र असलेल्या सिलिकॉन व्हॅलीने कोरोना विषाणूच्या फैलावानंतर उद्भवलेल्या स्थितीला सामोरे जाण्याची तयारी एप्रिल पासूनच सुरु केली होती. यामध्ये कर्मचारी कपात, वेतनात कपात आणि नव्या कर्मचारी भरतीस स्थगितीचा समावेश होता. आघाडीचे गुंतवणूकदार रंगास्वामी यांनी पीटीआय’सोबत बोलताना याबाबत माहिती दिली होती.

रंगास्वामी यांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्टार्टअपच्या स्थितीबाबत म्हटले होते की, या सर्व कंपन्या सध्या त्यांच्याकडे १८ ते २४ महिन्यांसाठी पर्याप्त रोकड आहे की नाही याची चाचपणी करत आहेत. पैसे गोळा करण्यासाठी हा वाईट काळ आहे. कारण आता जर ते पैसे जमवण्याचा प्रयत्न करु लागले तर त्यांना अत्यंत कमी किंमत मिळेल. अशात मला वाटते की, पुढील महिन्यात बे एरियातून तुम्हाला मोठ्या संख्येने बेरोजगारीच्या बातम्या वाचायला मिळतील.

दुसरीकडे जेव्हा जेव्हा प्रमुख अर्थव्यवस्थेचे शेअर खाली पडत आहे. तेव्हा चीन आशिया खंडातील वित्तीय संस्थांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. चीनने काही वर्षांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. देशात कोरोनामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कमजोर पडत असताना महत्त्वाच्या वित्तीय संस्थांमध्ये चीन गुंतवणूक करत आहे.

दरम्यान, देशातील १२ टक्के स्टार्टअप बंद पडले असून, तब्बल ७० टक्के स्टार्टअपची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या गंभीर झाली आहे. इंडस्ट्री चेंबर फिक्की व इंडियन एंजेल नेटवर्क यांनी ‘भारतीय स्टार्टअपवर झालेला करोनाचा प्रभाव’ या विषयावर एक पाहणी केली. या पाहणीच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अहवालानुसार ३३ टक्के स्टार्टअपने आपली गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तर १० टक्के स्टार्टअपचे करार संपुष्टात आले आहेत. केवळ २२ टक्के स्टार्टअपकडेच पुढील तीन ते सहा महिने निर्धारित खर्चासाठी निधी उपलब्ध आहे. तर ६८ टक्के स्टार्टअपनं खर्चाला कात्री लावण्यास सुरूवात केली आहे.

 

News English Summary: As many as 12 per cent of startups in the country have shut down and 70 per cent of startups are in dire financial straits. Industry Chamber FICCI and Indian Angel Network conducted a survey on ‘The Impact of Corona on Indian Startups’.

News English Title: Coronavirus Effect India 70 Percent Startups Facing Unprecedented Situation News Latest Updates.

हॅशटॅग्स

#startup(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x