12 January 2025 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 99% प्रवाशांना ठाऊक नाही रेल्वे तिकीट बुकिंगची ही ट्रिक, स्लीपर तिकिटाच्या पैशांत AC प्रवास करू शकाल EPFO Minimum Pension | खाजगी पेन्शनधारकांना दरमहा किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार, महत्वाची अपडेट आली Bank Account Alert | बँक बचत खात्यात 'या' पेक्षा जास्त रकमेचे व्यवहार करू नका, केला तर इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Business Idea | महिला आणि तरुण सुद्धा घरातून सुरु करू शकतात 'हा' डिमांडिंग व्यवसाय, महिना लाखोत कमाई होईल Samsung Galaxy S25 | सॅमसंगच्या आगामी स्मार्टफोनची लॉन्चिंग आधीच डिटेल्स लिक, स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स तपासून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRB Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, तेजीचे संकेत - NSE: TATAPOWER
x

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली | ESIC सदस्यांना ३ महिन्यांचा ५०% पगार मिळणार

Lockdown, Unemployment Allowance, ESIC, Modi Govt

नवी दिल्ली, २१ ऑगस्ट: कोरोना संकटामुळे लाखो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकजण घरी गेल्याने, कंपन्या बंद असल्याने बेरोजगार झाले आहेत. अशा औद्योगिक कामगारांसाठी सरकारने खूप चांगली बातमी दिली आहे. या कामगारांना त्यांच्या तीन महिन्याच्या पगाराच्या सरासरीच्या ५० टक्के रक्कम अनएम्पलॉयमेंट बेनिफिटच्या रुपात दिली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास ४० लाख कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. सरकारने नियमांमध्ये सूट देत कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांसाठी ही योजना आणली आहे. यासाठी तीन महिन्यांचे त्याना मिळणारे वेतन एकत्र करून त्याच्या निम्मे देण्यात येणार आहे. हा फायदा त्याच कामगारांना मिळणार आहे, ज्यांच्या नोकऱ्या २४ मार्च ते ३१ डिसेंबर पर्यंत गेल्या आहेत. मिंट या वृत्तपत्राने याचे वृत्त दिले आहे. यानुसार हा प्रस्ताव कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) च्या बैठकीत मांडण्यात आला होता. ESIC ही सरकारी संस्था असून ती २१००० रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना, कामगारांना ESI स्कीम अंतर्गत विमा पुरविते.

लॉकडाउन जाहीर झाल्यापासून म्हणजेच २४ मार्च ते ३१ डिसेंबपर्यंतच्या कालावधीत कर्मचारी तीन महिन्यांच्या (९० दिवस) ५० टक्के पगारावर दावा करण्यास पात्र असणार आहेत. मात्र यासाठी ते किमान दोन वर्षांसाठी (१ एप्रिल ते ३१ मार्च) कर्मचारी राज्य विमा योजनेशी जोडलेले असणं अनिवार्य आहे. याशिवाय १ ऑक्टोबर २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत किमान ७८ दिवसांसाठी त्यांनी योगदान दिलेलं असंल पाहिजे.

तीन महिन्यांच्या ५० टक्के पगारावर कर्मचारी दावा करु शकतात. आधी ही मर्यादा २५ टक्के होती. याशिवाय अजून एका नियमात बदल करण्यात आला आहे. आधी बेरोजगार झाल्यानंतर ९० दिवसांनंतर याचा फायदा घेतला जाऊ शकत होता. पण आता ही मर्यादा कमी करत ३० दिवसांवर आली आहे. कामगार राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली आहे. राज्य विमा महामंडळाचे तसंच भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय कार्यकारी सदस्य असणाऱ्या व्ही राधाकृष्णन यांनी सरकारच्या या निर्णयामुळे ३० ते ३५ लाख कामगारांना फायदा मिळणार असून नोकरी गेलेल्यांना दिलासा मिळेल असं म्हटलं आहे.

 

News English Summary: Relaxing the eligibility criteria to avail the unemployment allowance under the Employees’ State Insurance Corporation (ESIC), the Centre announced that workers can directly claim 50 per cent of the average wage as against 25 per cent earlier, payable up to 90 days of joblessness, for their loss of employment between March 24 and December 31 in the wake of the COVID-19 pandemic. The benefits would be payable 30 days after unemployment as against 90 days earlier, ESIC said in a release after a meeting chaired by Labour and Employment Minister Santosh Kumar Gangwar on Thursday.

News English Title: Coronavirus The Center govt Eased Norms To Offer 50 Percent Of Salary For Three Months As Unemployment Allowance News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x