17 January 2025 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL Bank Clerk Recruitment | तरुणांसाठी सुवर्ण संधी, सरकारी बँकेत PO आणि क्लार्क पदांसाठी भरती, मोठ्या पगाराची संधी सोडू नका Tata Punch on Road Price | 1 लाखांच्या डाऊन पेमेंटवर 'टाटा पंच' तुमची, महिन्याला भरावी लागणारी EMI ची किंमत पहा Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा PPF Investment Formula | PPF मध्ये फक्त पैसे गुंतवू नका, या फॉर्म्युल्याने PPF बचत करा, मिळेल करोडमध्ये परतावा SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI म्युच्युअल फंडात 500 रुपयांची गुंतवणूक सुरु करा, मिळेल 35 लाख रुपये परतावा Post Office Scheme | 100, 500, 1000 आणि 2000 रुपयांच्या पोस्ट ऑफिस RD गुंतवणुकीतून किती परतावा मिळेल, रक्कम इथे पहा
x

लॉकडाऊनची मदत झाली, पण तो दीर्घकाळ राहिल्यास अर्थव्यवस्थेला मोठा धोका

Lockdown, Anand Mahindra

नवी दिल्ली, १२ मे: देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६०४ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या ७० हजार ७५६ झाली आहे. लॉकडाउन असतानाही दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. आतापर्यंत करोनानं २२९३ जणांचा बळी घेतला आहे. या सर्वांमध्ये दिलासादाक बाब म्हणजे देशात अजूनही समूह संसर्ग झालेला नाही. देशात आतापर्यंत २२ हजार ४५४ जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४६ हजार ८ आहे.

दरम्यान, आनंद महिंद्रा यांनी लॉकडाउनचं समर्थन केलं, मात्र त्यासोबत अर्थचक्र देखील महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, जपानमधील युद्धात पराभूत झालेल्या योद्ध्यांनी युद्धबंदी होण्यापासून वाचण्यासाठी स्वत:च्या पोटात चाकू खुपसून आत्महत्या करण्याच्या पर्याय निवडला होता, त्या प्रथेला हारकिरी असे म्हटले जाते. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असल्याचं वाटत असतानाच नवीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. आपली लोकसंख्या आणि उर्वरित जगातील कोरोना संक्रमणाची कमी प्रकरणं पाहिल्यास आपल्याकडे तपासण्या वाढल्या असल्या तरी संसर्ग होण्याच्या नवीन घटनांत वाढ होणे अपरिहार्य आहे. आम्ही आलेख तात्काळ खाली येईल, अशी आम्ही अपेक्षा करू शकत नाही.

पण याचा अर्थ लॉकडाऊनने काहीही मदत झाली नाही, असा नाही. महिंद्रा म्हणाले की, भारताने आपल्या कोरोना युद्धात कोट्यवधी संभाव्य मृत्यू टाळले आहेत. लॉकडाऊन दीर्घकाळ राहिल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका आहे. वाढत्या धोक्यापासून अर्थव्यवस्थेला वाचवण्याची गरज असून, रुग्णालयातील ऑक्सिजन, पीपीई कीट सारखं सामान मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं आहे. तसेच सामाजिक अंतराचं पालन करणंही आवश्यक आहे, असंसुद्धा आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.

दुसरीकडे, ब्रिटनमध्ये कोरोनाचा फटका बसलेली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याकरता पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सर्व व्यवहार सुरू करण्याकरिता योजना जाहीर केली आहे. त्यामुळे तेथील लोकांना सामाजिक अंतराचा नियम पाळून आताच्या तुलनेत बराच काळ घराबाहेर राहण्याची संधी मिळणार आहे. जॉन्सन हे नुकतेच करोनाच्या संसर्गातून बरे झाले असून त्यांनी दूरचित्रवाणीवरील भाषणात सांगितले की, पाच पातळ्यांवरची सतर्कता यंत्रणा सरकार राबवणार असून त्यात करोना विषाणू पसरण्याच्या वेगावर वैज्ञानिक माहितीच्या आधारे लक्ष ठेवले जाणार आहे.

 

News English Summary: Mahindra said India has avoided billions of possible deaths in its Corona War. Prolonged lockdown poses a major threat to the country’s economy. There is a need to save the economy from the growing threat, and there is a need to make hospital supplies like oxygen and PPE kits available in large quantities.

News English Title: Covid 19 Increasing lockdown would be suicide economy Anand Mahindra News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x