22 December 2024 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

रेडीरेकनर दरात वाढ नाही | मुद्रांक शुल्क सूट संपुष्टात

Current, ready reckoner rates, Property Purchase

मुंबई, ०१ एप्रिल: करोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने आणि गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वाढवण्यात आलेल्या वार्षिक मूल्यदरांना (रेडीरेकनर) अद्याप सहाच महिने झाले असल्याने यंदा रेडीरेकनर दरांत वाढ न करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. त्यानुसार १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या आर्थिक वर्षासाठी सध्याचेच दर कायम ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, मुद्रांक शुल्कातील सवलत ३१ मार्चपासून बंद करण्यात आली आहे. महिला घर खरेदीदारांना १% मुद्रांक शुल्क सवलत मिळेल, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी दिली. ते म्हणाले, सप्टेंबर २०२० मध्ये रेडीरेकनर दरात वाढ झाली हाेती. त्यामुळे बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला. मात्र मुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे बांधकाम व्यवसाय व मालमत्ता खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला. त्या पार्श्वभूमीवर क्रेडाईने रेडीरेकनर दरात वाढ करू नये, अशी विनंती केली होती.

महिला गृह खरेदीदारांना मुद्रांक शुल्कात १% सूट:
जागतिक महिला दिनानिमित्त महिला किंवा महिलांच्या नावाने घरांच्या खरेदी-विक्रीवर मुद्रांक शुल्कात १ टक्का सवलतीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली होती. ती १ एप्रिल २०२१ पासून लागू झाली. महिलांच्या नावाने होणाऱ्या घराच्या अभिहस्तांतरण वा विक्री करारपत्राच्या दस्तावर मुद्रांक शुल्काच्या १% सवलत मिळेल.
तथापि, या सवलतीचा लाभ घेतल्यानंतर महिला खरेदीदाराला खरेदी दिनांकापासून १५ वर्षांच्या कालावधीपर्यंत कोणत्याही पुरुष खरेदीदारास विकता येणार नाही. अशा प्रकारे विक्री केल्यास कमी केलेले एक टक्के मुद्रांक शुल्क व लागू होणारा दंड भरावा लागेल.

 

News English Summary: The state government on Wednesday decided not to increase the redireckoner rates this year as the crisis in the corona is still raging and it is still six months since the annual redemption rates were raised in September last year. Accordingly, the current rates have been maintained for the financial year 1 April 2021 to 31 March 2022.

News English Title: Current ready reckoner rates have been maintained for the financial year 1 April 2021 to 31 March 2022 news updates.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x