20 January 2025 2:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, अपडेट नोट करा - NSE: TATASTEEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Reliance Power Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार 42 रुपयाचा शेअर, कर्ज मुक्त कंपनी फोकसमध्ये - NSE: RPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: IRB
x

सामान्यांचे जगणे महाग | घरगुती एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महागला

LPG cylinder price

मुंबई, ०१ ऑगस्ट | सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीत विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 884.50 रुपये झाले आहे. त्याचबरोबर 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीतही 75 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

सामान्यांचे जगणे महाग, घरगुती एलपीजी सिलिंडर 25 रुपयांनी महागला – Domestic LPG cylinder rates hike by rupees 25 in India :

15 दिवसांत सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाले:
यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजेच 15 दिवसात विनाअनुदानित सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाले आहे.

2021 मध्ये गॅस सिलिंडर 190.50 रुपयांनी महाग झाले:
या वर्षी 1 जानेवारीला दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 694 रुपये होती. आता सिलिंडरची किंमत 884.5 रुपये आहे. म्हणजेच जानेवारीपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 190.50 रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या 7 वर्षात गॅस सिलिंडरची किंमत दुप्पट झाली आहे:
गेल्या 7 वर्षांत घरगुती गॅस सिलिंडर (14.2 किलो) ची किंमत दुप्पट होऊन 884.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. 1 मार्च 2014 रोजी 14.2 किलो घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 410.5 रुपये होती, जी आता 884.50 रुपये आहे.

19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत:
दिल्लीमध्ये 19 किलो व्यावसायिक गॅसची किंमत 1693 रुपये आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये 1,772 रुपये, मुंबईत 1,649 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,831 रुपये प्रति सिलिंडर आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Domestic LPG cylinder rates hike by rupees 25 in India.

हॅशटॅग्स

#LPG(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x