14 January 2025 1:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

घोटाळे आणि भाजप नेत्यांशी आर्थिक कनेक्शन | सुनील झंवर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेचे छापे

Economic offences wing, Girish Mahajan, Sunil Zanvars, BHR Society case

जळगाव, २९ नोव्हेंबर: केंद्रातील भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयावर धाड टाकल्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. त्यानंतर महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या बाबतीतही तेच घडणार असल्याचे तर्क लावण्यात आले होते. मात्र त्यानंतर शिवसेनेने देखील भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली होती. तसेच महाविकास आघाडी सरकारदेखील भाजपच्या नेत्यांचे कनेक्शन शोधून त्यांच्या मागे हात धुवून लागणार याचे संकेत देखील राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळत होते. त्याचा प्रत्यय येण्यास सुरुवात झाली आहे असे म्हणावे लागेल.

कारण भारतीय जनता पक्षाचे सकंटमोचक अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांचे राईट हॅन्ड समजले जाणारे जळगाव येथील सुनील झंवर (Former Minister Girish Mahajan and Sunil Zanwar connections) या उद्योजकावर BHR सोसायटी प्रकरणात (Economic offences wing raids on BHR Society Scam Case) राज्य आर्थिक गुन्हे शाखेने मोठी छापेमारी केल्याचं वृत्त आहे. राज्यातील मोठे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाला काहीदिवसच पूर्ण झालेले असताना महाजनांचे खंदे समर्थक आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले आल्याने भाजपचे देखील धाबे दणाणले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेले गिरीश महाजन यांनाच अप्रत्यक्षरित्या कोंडीत पकडण्याची व्यूहरचना असल्याचं समजतं.

बेनामी मालमत्तेच्या ठेवींप्रकरणी चौकशीच्या रडारवर असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी अर्थात ‘बीएचआर’शी निगडित जळगावात पाच ठिकाणी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या तब्बल १३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापे टाकले. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारे सुनील झंवर यांच्या विविध फार्मवरदेखील छापे टाकल्याने ही कारवाई राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे.

तब्बल दीड हजार कोटींच्या आर्थिक घोटाळ्यात ठेवीदारांची रक्कम परत देण्यासाठी जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नेमणूक करण्यात आली. परंतु, कंडारे यांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांना हाताशी धरून कर्जदारांच्या जमिनी, तसेच स्थावर मालमत्ता कवडीमोल भावात विकल्याचा अत्यंत गंभीर आरोप आहे. ठेवींच्या रकमा मॅचिंग करण्यासह तडजोडीच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार अवसायकांमार्फत करण्यात आले. मात्र, ठराविक व्यक्तींनी या जमिनी, तसेच स्थावर मालमत्ता मातीमोल भावात खरेदी केल्या. यात झंवर यांचे नाव अग्रस्थानी आहे.

विशेष म्हणजे झंवर आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे घनिष्ट राजकीय संबंध (Former Minister Girish Mahajan and Sunil Zanwar connections) सर्वश्रुत आहेत. गिरीश महाजन यांच्या आरोग्य शिबिरांसह अन्य कार्यक्रमांना झंवर यांच्या संस्थेचेच ‘मोठं फंडिंग’ असते. त्यामुळे झंवर यांच्यावर झालेली कारवाई ही अप्रत्यक्ष महाजन यांच्यावरच निशाणा साधण्याचा प्रकार समजला जात आहे. एकनाथ खडसे राज्य सरकारला भ्रष्टाचाराची कागदपत्रे पुरवून फडणवीस आणि महाजन यांना कोंडीत पकडत असल्याची चर्चा आता जळगावमध्ये सुरू झाली आहे. महाजन समर्थक असलेल्या झंवर यांच्यावर एकनाथ खडसेंनी शालेय पोषण आहार घोटाळ्यात यापूर्वी अनेक वेळा गंभीर आरोप केले आहेत. महाजन यांची आर्थिक शक्ती असलेल्या झंवर यांच्यावर बीएचआर प्रकरणी कारवाई करून महाजनांना अप्रत्यक्षपणे इशारा देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

झंवर यांच्या व्यवहारांचे नाशिक कनेक्शनही चर्चेत आहे. नाशिकमधील भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची नेहमीच ऊठबस आहे. महापालिकेतील अनेक ठेक्यांमध्येही झंवर यांची पार्टनरशिप असल्याची भारतीय जनता पक्षामध्येच चर्चा आहे. त्यामुळे झंवर यांच्या नाशिक कनेक्शनमुळे अनेक पदाधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता आहे.

 

News English Summary: Sunil Zanwar, an entrepreneur from Jalgaon who is considered to be the right hand man of former minister Girish Mahajan, is known to be the scapegoat of the Bharatiya Janata Party. Just a few days after the entry of Eknath Khadse, a senior leader in the state and a former minister, into the NCP, Mahajan’s staunch supporters came on the radar of the Economic Crimes Branch, leaving the BJP in a quandary. Girish Mahajan, a staunch supporter of Devendra Fadnavis, is understood to have a strategy to indirectly trap him.

News English Title: Economic offences wing raids on Girish Mahajan supporter trader Sunil Zanvars BHR Society case News updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x