अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाच्या उंबरठ्यावर – शक्तिकांत दास
मुंबई, २२ ऑक्टोबर : कोरोनामुळे देशाची आर्थिक स्थिती ढासळली होती ती आता हळूहळू पूर्ववत होत असल्याची माहिती रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली आहे. केंद्र सरकार आणि मध्यवर्ती बँकेकडून परिस्थितीजन्य लवचीकता दाखवत मौद्रिक आणि वित्तीय धोरणांचा सातत्याने पाठपुरावा केला गेल्याने, देशाची अर्थव्यवस्था आता पुनरुज्जीवनाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपली आहे, असे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल म्हटले आहे.
नोकरशहा आणि वित्त आयोगाचे वर्तमान अध्यक्ष एन. के. सिंग यांनी लिहिलेल्या ‘पोर्ट्रेट्स ऑफ पॉवर : हाफ सेंच्युरी ऑफ बीइंग अॅट रिंगसाइड’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात दास बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आपण जवळजवळ पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेच्या उंबरठय़ावर पोहोचलो असून, अशा समयी वित्तीय संस्थांकडे (अर्थवृद्धीला पाठबळ देण्यासाठी) पर्याप्त स्वरूपात भांडवल असणे नितांत आवश्यक आहे.’’
बँकांनी भांडवलदृष्टय़ा सक्षम असण्याची गरज प्रतिपादित करताना, त्यांनी अनेक बँकांनी भांडवल उभारणी केली आहे आणि अन्य अनेकांच्या तशा योजना तयार आहेत, त्या पुढील काही महिन्यांत निश्चितच त्या पूूर्णत्वाला नेतील, असेही दास यांनी नमूद केले.
करोनाकाळाने निर्माण केलेल्या आव्हानांचा भारताने वित्तीय व्याप्ती वाढवून समर्थपणे सामना केला. एकदा करोनाच्या संक्रमणावर नियंत्रण मिळविले गेले तर मात्र भारताने अनुसरायच्या वित्तीय शिस्तीच्या मार्गाची आखणी सरकारला करावी लागेल. मौद्रिक आणि वित्तीय धोरणांनी एकसूत्रता राखतानाच, बदलत्या परिस्थितीला अनुकूल लवचीकता दाखविणे आवश्यकच असल्याचे त्यांनी सांगितले.
News English Summary: Reserve Bank of India (RBI) governor Shaktikanta Das on Wednesday said that the Indian economy, which has been battered by the ongoing coronavirus pandemic, is at the doorstep of revival. Speaking at the launch of the book ‘Portraits of Power: Half a Century of Being at Ringside’, written by former bureaucrat and current chairman of the finance commission N K Singh, Das said: “We are almost at the doorstep of revival process and it’s very important that the financial entities have adequate capital (to support growth).”
News English Title: Economy On The Threshold Of Revival said RBI governor Shaktikant Das News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय