एलन मस्क यांची SpaceX भारतीय टेलिकॉम क्षेत्रात उतरणार | दिगज्जांना धक्का देणार

नवी दिल्ली, ०८ फेब्रुवारी: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आणि सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. टेस्ला कंपनीने कर्नाटकमधील बंगळुरु येथे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी केली आहे. कंपनी बंगळुरुत लक्झरी इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती आणि विक्री करणार आहे. कंपनीने बंगळुरुत कामाला सुरुवातदेखील होणार आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून या महिन्यात मस्क यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ब्लूमबर्ग बिलिनियर इंडेक्सच्या मते जानेवारी 2020मध्ये श्रीमंतांच्या यादीत मस्क 35 व्या स्थानी होते. 1 जानेवारी 2020 मध्ये त्यांची संपत्ती 27.6 अब्ज डॉलर होती. तिमाहीनंतर म्हणजे 1 एप्रिल 2020मध्ये त्यांची संपत्ती 29 अब्ज डॉलर झाली. दुसऱ्या तिमाहीत म्हणजे 1 जुलै 2020मध्ये हा आकडा 57 अब्ज डॉलर झाला. तर तिसऱ्या तिमाहीत म्हणजे 1 ऑक्टोबर 2020मध्ये त्यांची एकूण संपत्ती 108 अब्ज डॉलर झाली.
मात्र आता एलन मस्क यांची स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉरपोरेशन (SpaceX) स्टारलिंक प्रोजेक्ट भारतात आणणार आहे. यानंतर भारतीय टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करणार आहे. SpaceX भारतात सुरुवातीच्या काळात 100 Mbps सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्व्हिस देणार आहे. या तयारीनिशी कंपनी भारतात उतरण्याची शक्यता आहे. 1 ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ असलेल्या भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये मस्क आपल्या कंपनीचा विस्तार करणार आहेत.
Analyticsindiamag वेबसाइट नुसार भारत सरकारकडे मस्क यांच्या कंपनीने सॅटेलाईट बेस्ड ब्रॉडबँड टेक्नॉलॉजीची सेवा देण्यासाठी परवानगी मागितली आहे. ट्रायने गेल्या वर्षी एक प्रस्ताव पाठविला होता. याला स्पेस एक्सने उत्तर पाठविले आहे. यामध्ये SpaceX ची विंग सॅटेलाईट गव्हर्नमेंट अफेअर्सने हाय स्पीड सॅटेलाईट नेटवर्क भारतात सर्व लोकांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटीने जोडण्याच्या लक्ष्यामध्ये मदत करू शकते, असे म्हटले आहे.
भारतात इंटरनेट युजरचे मोठी बाजारपेठ आहे. येथे 70 कोटी इंटरनेट ग्राहक आहेत. यांची संख्या 2025 पर्यंत वाढून 97.4 कोटी होण्याची शक्यता आहे. सध्या भारतात इंटरनेट स्पीड 12 Mbps आहे. 5जी आल्यानंतर भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. दुसरीकडे, देशातील गाव आणि दुर्गम भागात इंटरनेट पोहोचविण्यास वेळ लागणार आहे. हेच काम SpaceX च्या स्टारलिंक प्रोजेक्टने आरामात केले जाऊ शकते. कारण थेट सॅटेलाईटवरून या भागात इंटरनेट सेवा पुरविता येणार आहे. याचसोबत ही सेवा कमी किंमतीतही उपलब्ध होणार आहे. फायबर ऑप्टिक केबल टाकण्यास हजारो कोटी लागणार आहेत. त्यापेक्षा वायरलेस असलेल्या सॅटेलाईट सेवेद्वारे खर्चही कमी येणार आहे.
स्पेसएक्स 2027 पर्यंत अंतराळात 12000 सॅटेलाईट पाठविण्याची तयारी करत आहे. याचबरोबर जमिनीवरही या सॅटेलाईटचे स्टेशन तयार करणार आहे. SpaceX नुसार त्यांचा इंटरनेट स्पीड हा 50Mbps ते 150Mbps एवढा असणार आहे.
News English Summary: Now Elan Musk’s Space Exploration Technologies Corporation (SpaceX) is bringing the Starlink project to India. After this, it will enter the Indian telecom sector. SpaceX will initially offer 100 Mbps satellite based internet service in India. With this preparation, the company is likely to land in India. Musk will expand his company to countries like India and China with a market of डॉलर 1 trillion.
News English Title: Elan Musk SpaceX company may enter in Indian telecom sector news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA