18 January 2025 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Income Tax Notice | पगारदारांनो, 'या' 9 कारणांमुळे तुम्हाला मिळू शकते इन्कम टॅक्सची नोटीस, असा करू शकता बचाव Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा
x

कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडता येणार | केंद्र सरकारकडून ड्राफ्ट जारी

Employees, Work from home, Govt Draft

नवी दिल्ली, २ जानेवारी: कोरोना आपत्ती जाहीर झाल्यानंतर भारत सरकारने लॉकडाउन जाहीर केला आणि सामान्य कर्मचाऱ्यांसोबतच कंपन्यांवर संकट ओढवलं आहे. लॉकडाउनमुळे कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडणं अशक्य झालं आणि त्यावर तोडगा म्हणून शेकडो कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय खुला केल्याने इंटरनेट आधारित कामं करणं शक्य झालं. विशेष म्हणजे त्यामुळे कंपन्यांच्या एकूण ऑपरेटिंग कॉस्टमध्ये देखील घाट झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचा सर्वाधिक फायदा आयटी क्षेत्रातील कंपन्यांना झाला.

मात्र कोरोना आपत्तीने जगाला आणि उद्योग क्षेत्राला मोठा धडा दिला. त्यामुळे अशी परिस्थिती भविष्यात देखील ओढवण्याची शक्यता नाकारता येत असल्याने उद्योगक्षेत्र आणि भारत सरकार देखील भविष्यतील विचार करताना दिसत आहे.

इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या नव्या कायद्याच्या ड्राफ्टमध्ये खाणकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या वर्क फ्रॉम होम ड्राफ्टनुसार आयटी सेक्टरला अनेक सवलती मिळू शकतात. या ड्राफ्टमध्ये आयटी कर्मचाऱ्यांना कामाच्या तासांमध्ये सवलत मिळू शकते. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठीसुद्धा ड्राफ्टमध्ये तरतूद करण्यात आली आहे. श्रममंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सेवा क्षेत्रातील गरजांच्या हिशोबाने पहिल्यांदा वेगळे मॉडेल तयार करण्यात आले आहे. नव्या ड्राफ्टमध्ये सर्व श्रमिकांसाठी रेल्वे प्रवासाच्या सुविधेचीही तरतूद करण्यात आली आहे. तर नव्या ड्राफ्टमध्ये नियम मोडल्यास शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.

 

News English Summary: According to the Economic Times, the draft law will include employees in the mining, manufacturing and services sectors. According to the work from home draft of the Union Ministry of Labour, the IT sector can get many concessions. In this draft, IT employees can get a discount during working hours. According to the Ministry of Labour, the draft also provides for the protection of employees working in the IT sector.

News English Title: Employees will now be able to choose the option of work from home a draft issued by the union government News updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x