4 January 2025 3:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

Fastag चा फंडा, 24 तासात परत आलात तर मिळणार डिस्काऊंट | पण कसा त्यासाठी वाचा

FasTag

मुंबई, ०६ जुलै | कोणत्याही महामार्गावरून प्रवास करत असताना जर 24 तासात परत यायचं असेल, तर वाहनधारकांना टोलमध्ये सवलत मिळते. फास्टॅग (Fastag) वापरणाऱ्या अनेकांना याची तांत्रिक माहिती नसल्यामुळे अनेकदा गैरसमजांना आमंत्रण मिळतं. फास्टॅग बंधनकारक होण्यापूर्वी ज्याप्रमाणं 24 तासांत परत यायचं असेल तर टोलमध्ये सवलत मिळत होती, तशीच सवलत आता फास्टॅग पद्धतीतही मिळते. मात्र ती समजून घेणं गरजेचं असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

पद्धत बदलली, सवलत नव्हे:
पूर्वी हायवेवरन प्रवास करताना एखाद्या टोलनाक्यावरून आपण 24 तासांच्या आत परत येणार असू, तर टोलच्या एकूण रकमेवर 25 टक्के सवलत मिळत असे. टोल बंद झाल्यामुळे ही सवलत बंद झाली, असं अनेकांना वाटतं. मात्र उलट ही सवलत बंद झाली नसून आता 25 टक्क्यांऐवजी 50 टक्के सवलत मिळते. प्रत्यक्षात जेव्हा वाहन टोलनाक्यावरून पास होतं, तेव्हा फास्टॅग खात्यातून रक्कम वजा होता. 24 तासांच्या पुन्हा त्याच टोलनाक्यावरून परतीच्य मार्गे आलं तरी पूर्ण रक्कम खात्यातून कापली जाते. मात्र काही तासांत सर्व्हरला याची सूचना जाते आणि सवलतीची रक्कम पुन्हा एकदा वाहनधारकाच्या खात्यात जमा होते.

अशी चालते यंत्रणा:
एखादं वाहन जेव्हा टोलनाक्यावर जातं, तेव्हा तिथं आकारल्या जाणाऱ्या टोलची पूर्ण रक्कम फास्टॅग खात्यातून कापली जाते. 24 तासांच्या आत जरी परत आलं, तरी फास्टॅगच्या यंत्रणेला याचा फिडबॅक नसल्याने पूर्ण रक्कमच कापली जाते. मात्र फास्टॅग सर्व्हरवर एक वाहन एका टोलनाक्यावरून जाऊन 24 तासांच्या आत परत आल्याची नोंद होते. त्यानंतर एका वेळच्या टोलच्या 50 टक्के टोलची रक्कम ही संबंधित खात्यावर वळती करण्यात येते.

तुम्ही 24 तासांच्या आत एखाद्या टोलनाक्यावरून परत आलात आणि तरीही तुमच्या खात्यावर सवलीतीची रक्कम जमा होत नसेल, तर तुमच्या संबंधित बँकेला याची कल्पना द्या, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. कधीकधी सर्व्हरला प्रोसेसिंग करायला वेळ लागल्याने 10 ते 12 तासही यासाठी लागू शकतात. मात्र बहुतांश वेळा खात्यातून रक्कम कापली गेल्यानंतर दोन ते तीन तासांत ती पुन्हा खात्यात जमा होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Fastag also get discount if return from toll plaza within 24 hours news updates.

हॅशटॅग्स

#Fastag(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x