5 November 2024 4:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

२६ फेब्रुवारीला ब्रेकिंगन्यूजमध्ये मारलेल्या मसूदच्या भावांचे आवाज ३ मार्चला कसे ऐकू येत आहेत?

Pakistan, IAF, PAF, Pulawama Attack

नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने २६ फेब्रुवारी मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेल्या हल्ला करून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद संघटनेचा प्रशिक्षण तळ आणि शस्त्रास्त्रांचा अगणित साठा पूर्णपणे बेचिराख झाल्याच्या ब्रेकिंग न्यूज झळकताना दिसल्या. त्यानंतर काही वेळाने, एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख नेते मारले गेले आहेत. त्यात अफगाणिस्तान व काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मौलाना अम्मर, मौलाना मसूद अजहरचा भाऊ मौलाना तल्हा सैफ, काश्मीरमधील कारवायांचा प्रमुख असलेला मुफ्ती अझर खान आणि आयसी-८१४ विमानाच्या अपहरणात सहभागी असलेला मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर हे देखील मारले गेल्याच्या बातम्या झळकत आहेत.

दरम्यान, परराष्ट्र खातं, संरक्षण खातं आणि स्वतः वायुदलाकडून कोणतीही अधिकृत माहिती नसताना अनेकांनी २००, ३००, ३५० असे वेगवेगळे दाखवत दहशदवादी मारले गेल्याच्या बातम्या पेरल्या होत्या. आज त्यातील काही माध्यमं चक्क त्याच मसूद अजहरचा भावाचा आवाज ३ मार्चला देशाला ऐकवत आहेत. विशेष म्हणजे तो आवाज मसूद अजहरचा भावाचा आहे आणि यापूर्वी तो कोणत्या माध्यमांनी ऐकला होता का याचा काहीच पुरावा नाही.

विशेष म्हणजे ‘हा घ्या पुरावा’ अशा शीर्षकाखाली बातम्या पेरत आहेत. बरं ते त्यांनी तो आवाजाची ऑडिओ क्लिप एकवताना त्याचं नाव जाहीर करण्याची खबरदारी घेतली आहे. कारण उद्या प्रश्नचिन्ह उपस्थित होताच, तो मसूद अजहरच्या कोणत्यातरी ‘चचेरे भाई’चा किंवा दूरचा भाऊ अशी पळवाट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे २६ फेब्रुवारीला मारलेले ३ मार्चला जवाब देत आहेत हे खरंच मायावी म्हणावं लागेल.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x