पेट्रोल-डिझेल आणि नैसर्गिक गॅस जीएसटीच्या कार्यकक्षेत आणण्याचा प्रस्ताव नाही - अर्थमंत्री
नवी दिल्ली, १६ मार्च: इंधनविक्रीमधून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात महसूल कमवत असल्याचा खुलासा खुद्द केंद्रानेच केला आहे. अबकारी कर, उपकर आणि अधिभार या माध्यमातून इंधनविक्रीमधून केंद्राची घसघशीत कामाई होत असल्याची कबुली सरकारने दिली आहे. त्यात मागील काही दिवसांपासून इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल डिझेल जिएसटीच्या कक्षेत आणणार असल्याची चर्चा सुरु आहे.
दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर जीएसटीच्या कार्यकक्षेत आणण्याच्या वृत्तावर आता अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तूर्तास क्रूड पेट्रोलियम, पेट्रोल, डिझेल, हवाई वाहतूक इंधन आणि नैसर्गिक गॅस यांना जीएसटीच्या कार्यकक्षेत आणण्याचा कोणताच प्रस्ताव नाही, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या. लोकसभेत एका प्रश्नावर लेखी उत्तर देताना, निर्मला सीतारमण यांनी हे स्पष्ट केलं. पेट्रोलियम पदार्थ जीएसटीमध्ये आणण्याचा कोणताही प्रस्ताव जीएसटी कौन्सिलकडून आलेला नाही. योग्यवेळी या प्रस्तावावर विचार केला जाईल, असं सीतारमण म्हणाल्या. (Finance Minister Nirmala Sitharaman gave explanation on news of bringing petrol diesel under GST)
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कार्यक्षेत्रात आणण्याची मागणी होत आहे. वाढलेल्या किमतीचा फायदा केंद्र आणि राज्य सरकारला होत आहे, मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. त्यामुळेची इंधनाचे दर जीएसटीच्या कार्यक्षेत्रात आणण्याची मागणी होत आहे. दिल्लीतील इंधनाच्या दराचं गणित मांडायचं झाल्यास, इंडियन ऑईलनुसार, एक लिटर पेट्रोलची मूळ किंमत 31.82 रुपये इतकी आहे. त्यावर केंद्र सरकार 32.90 रुपये टॅक्स वसूल करत आहे. त्याशिवाय राज्य सरकार 20.61 रुपये विविध करातून मिळवत आहे.
केंद्र आणि राज्यांचा टॅक्स मिळून 53.51 रुपये होतात. साधारण 32 रुपयांच्या पेट्रोलवर जवळपास दुप्पट टॅक्स लावला जात आहे. हेच महाराष्ट्रासह बहुतेक राज्यात आहे. जर पेट्रोल-डिझेलचे दर जीएसटीच्या कार्यकक्षेत आले, तर हे सर्व टॅक्स रद्द होऊन, एकच कर लागणे अपेक्षित आहे.
News English Summary: Now Finance Minister Nirmala Sitharaman has given an explanation on the news of bringing petrol-diesel rates under GST. At present, there is no proposal to bring crude petroleum, petrol, diesel, aviation fuel and natural gas under the purview of GST, said Nirmala Sitharaman.
News English Title: Finance Minister Nirmala Sitharaman gave explanation on news of bringing petrol diesel under GST news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH