26 December 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPCGREEN Bonus Share News | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - NSE: SURYAROSNI IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC
x

#Budget2020: GST मुळे एक लाख कोटींचा नफा : अर्थमंत्री

Finance Minister NIrmala Sitharaman, national Budget 2020

नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा करमुळे (जीएसटी) ग्राहकांना एक लाख कोटींचा नफा झाला असून इन्स्पेक्टर राजही संपुष्टात आलं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे. अर्थसंकल्प मांडत असताना जीएसटीची माहिती देताना निर्मला सीतारामन यांनी दिवंगत भाजपा नेते अरुण जेटली यांची आठवण काढली. जीएसटी लागू करणारे माजी अर्थमंत्री अरुण जेटली आज आपल्यात नाहीत असं सांगत निर्मला सीतारामन यांनी श्रद्धांजली वाहिली.

वस्तू आणि सेवा कराची (GST) सुधारित आवृत्ती येत्या एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केली. अर्थसंकल्पी भाषणादरम्यान त्यांनी वस्तू आणि सेवा कराची माहिती दिली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १६ कलमी विशेष कृती योजना जाहीर केली आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना विविध सोईसवलती पुरवण्याची घोषमा वित्तमंत्र्यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठीच्या या १६ कलमी योजनेसाठी २.८३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शेती पंपांना सौर उर्जेवर जोडण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. या अंतर्गत २० लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा संयंत्र दिलं जाईल. जी राज्ये केंद्र सरकारच्या कायद्यांचं मॉडेल स्वीकारतील त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. अन्नदाता उर्जादाता देखील आहे. पंतप्रधान कुसुम योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पाण्याच्या प्रश्नाशी झुंज देत असलेल्या १०० जिल्ह्यांसाठी व्यापक उपाय योजना केल्या जातील. २००९-१४ दरम्यान चलनवाढ १०.५% होती.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे. आर्थिक स्तरावर अनेक आव्हानांना सामोरं जाणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी, या अर्थसंकल्पातून काय सादर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. देशाचा आर्थिक विकासाचा दर म्हणजे जीडीपी २०२०- २१ या कालावधीत ६ ते ६.५ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

 

Web Title:  Finance Minister NIrmala Sitharaman on National Budget 2020.#Budget2020: GST मुळे एक लाख कोटींचा नफा : अर्थमंत्री

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x