आयफोन ११ चे उत्पादन भारतात होणार, दक्षिण भारतात प्लांट सुरु होणार
चेन्नई, २४ जुलै : जगभर प्रसिद्ध असलेल्या आयफोनने चिनमधील उत्पादन बंद करून भारतात उत्पादन सुरू केलं आहे. आयफोन ११ चे उत्पादन भारतात होणार असून देशात प्रथमच टॉप मॉडेल तयार करण्यात येत आहे. म्हणजे, अॅपलने चीनमधून गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
चैन्नई येथील फॉक्सकॉन येथे उत्पादन सुरू केले आहे. तसंच, टप्प्याटप्प्यो अॅपल भारतात व्यवसाय वाढवणार असल्याचंही सांगण्यात येतंय. भारतात तयार करण्यात आलेल्या या फोनची निर्यात देखील केली जाऊ शकते. अर्थात याबाबतचा निर्णय अद्याप घेतला गेला नाही. यामुळे अॅपलचे चीनवरील अवलंबत्व कमी होईल. यामुळे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या मोहिमेलाही बळ मिळणार आहे.
भारतात उत्पादन होत असल्यामुळे अॅपलने आयफोन ११ च्या किंमती कमी केल्या नाहीत. कारण अद्याप अॅपल चीनमध्ये तयार करण्यात आलेले आयफोन भारतात विकत आहे. पण यापुढे आयफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. करण स्थानिक स्तरावर उत्पादन केल्यामुळे २२ टक्के इंपोर्ट ड्यूटी द्यावी लागणार नाही.
परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारनं जून महिन्यात ६.६ अब्ज डॉलर्सची विशेष योजना तयार केली होती. त्या अंतर्गत स्मार्टफोनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना फायनॅन्शिअल इंसेटिव्ह्स देऊन भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित केलं जात आहे. Pegatron Corps आयफोनची दुसरी सर्वात मोठी असेंबलर आहे. या कंपनीचा अर्धा व्यवसाय हा अॅपलकडूनच मिळतो. यासाठी कंपनीनं चीनमध्ये अनेक प्रकल्प सुरू केले आहेत.
दुसरीकडे अॅपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी भारतात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली होती. चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथे कारखान्याचा विस्तार करण्याचा फॉक्सकॉनचा विचार आहे. भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना असून फॉक्सकॉन अॅपल कंपनीसाठी आयफोन असेंबल करण्याचे काम करते.
News English Summary: The world-famous iPhone has discontinued production in China and resumed production in India. The iPhone 11 will be manufactured in India and a top model is being made for the first time in the country. That is, Apple has begun the process of rolling out gas from China.
News English Title: First time apple making a top of the line model in India News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
- Ather E Scooter | यंदाची दिवाळी एथर EV स्कूटरने खास बनवा, फीचर्स ऐकून चकित व्हाल आणि लगेच खरेदी करा - Marathi News
- Surabhi Jyoti Wedding | टेलिव्हिजन स्टार सुरभी ज्योती अडकली लग्न बंधनात, निसर्गरम्य वातावरणात थाटामाटात पार पडायला लग्नसोहळा
- Lakshmi Pujan | लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या चूका टाळा; जीवनात भरभराट येईल, सोबतच काही गोष्टी काटेकोरपणे पाळा
- Apollo Micro Systems Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, फायद्याची अपडेट, यापूर्वी 1380% परतावा दिला - NSE: APOLLO
- Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर
- Post Office Saving Scheme | पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवता, पण कोणत्या योजनेत टॅक्स माफ असतो हे 90% लोकांना माहित नसतं
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स शेअरमध्ये तेजीत संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, कमाईची संधी - NSE: APOLLO
- Monthly Pension Scheme | पैसे असे गुंतवा की, प्रत्येक महिन्याला 12,000 हातामध्ये येतील, 'या' खास योजनेबद्दल जाणून घ्या
- Salman Khan | बिश्नोई गॅंगच्या धमकीमुळे सलमान खान पोहोचणार दुबईला, नेमकं काय आहे सत्य पाहूया