भारताची अर्थव्यवस्था लवकरच अतिदक्षता कक्षातून रुग्णशय्येवर जाणार: माजी आर्थिक सल्लागार
नवी दिल्ली: भारताची अर्थव्यवस्था ही ‘महामंदी’चा सामना करीत असून, लवकरच तिची रवानगी अतिदक्षता कक्षात होऊ घातली आहे, असा घणाघात मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात देशाचे आर्थिक सल्लागार राहिलेले अरविंद सुब्रमणियन यांनी आपल्या नव्या शोध-अहवालात केला आहे.
मागील वर्षी ऑगस्टमध्ये सुब्रमणियन यांनी आर्थिक सल्लागारपदाचा मुदतपूर्व राजीनामा दिला आणि ते पुन्हा अमेरिकेत परतले. त्यांच्यासह आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी प्रमुख जॉश फेलमन यांनी संयुक्तपणे हा अहवाल तयार केला आहे. बँका अधिक बँकेतर वित्तीय कंपन्या, पायाभूत सोयी विकास क्षेत्र आणि स्थावर मालमत्ता कंपन्या या अर्थव्यवस्थेतील चार प्रमुख घटकांची प्रतिकूल व्याजदराने कोंडी होऊन त्यांची वाढ खुंटण्याचा परिणाम सध्या भारतात दिसून येत असल्याचा या लेखकद्वयींचा निष्कर्ष आहे.
तत्पूर्वी सरकारला दुहेरी ताळेबंदाच्या समस्येपासून सावध करतानाच यामुळे मोठी किंमत चुकवावी लागू शकते असा इशाराही त्यांनी दिला होता. हार्वर्ड विद्यापीठातील सेंटर फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या विभागातील एका अहवालात सुब्रमण्यन यांनी हे भाष्य केले आहे. ते म्हणतात, सध्या भारतीय अर्थव्यवस्थेला ट्वीन (दुहेरी) बॅलन्स शीटच्या (टीबीएस) दुहेरी लाटेचा सामना करावा करावा लागत आहे. ही स्थिती महामंदीच्या स्वरुपात परिवर्तीत होत आहे. सुब्रमण्यन यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, भारतातील आर्थिक मंदी ही सामान्य मंदी नाही. ही महामंदी आहे आणि त्यामुळे मोदी सरकारचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, भारतीय अर्थव्यवस्था मागील काही महिन्यांपासून अत्यंत बिकट परिस्थितीतून जातं आहे. मागील अवघ्या १५ दिवसात अशा अनेक घटना घडल्याअसून त्यावरून अर्थव्यवस्थेच्या दुर्दशेचा अंदाज स्पष्ट होतं आहे. सदर आकडेवारीवरूनच हा मोदी सरकारला मोठा धक्का असल्याचं अनेक अर्थतज्ज्ञांनी म्हटलं आहे. मागील काही दिवसात समोर आलेल्या आकडेवारीचा आधार त्यासाठी घेण्यात आला आहे.
दुसर्या तिमाहीच्या जीडीपीचे आकडे
२९ नोव्हेंबर रोजी चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीत (२०१९-२०) जीडीपीचे आकडे जाहीर करण्यात आले. या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की देशाची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट स्थितीत आहे. त्यानुसार दुसर्या तिमाहीत जीडीपीचा आकडा साडेचार टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जवळपास ६ वर्षातील कोणत्याही एका तिमाहीत ही सर्वात मोठी घसरण असल्याचं स्पष्ट झालं आहे. यापूर्वी मार्च २०१३ च्या तिमाहीत देशाचा जीडीपी दर याच पातळीवर होता. त्याच वेळी, ६ व्या तिमाहीत देखील घट झाली आहे.
कोअर उद्योगातील वाईट स्थिती
ऑक्टोबर महिन्यातील कोर सेक्टरची आकडेवारी देखील त्याच दिवशी जाहीर करण्यात आली. सरकारी ताज्या आकडेवारीनुसार, मागील वर्षांच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात कोर सेक्टरमध्ये ५.८ टक्के घसरण झाली. उद्योगातील खत क्षेत्र वगळता इतर ७ विषयांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती समोर आली. त्यानुसार यामध्ये कोळसा, क्रूड तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, स्टील, सिमेंट आणि वीज या प्रमुख उद्योगांचा यामध्ये समावेश आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पादनात (औद्योगिक उत्पादन) सुमारे ४० टक्के वाटा याच क्षेत्रांचा आहे.
आरबीआयनेही मोठा धक्का
५ डिसेंबर रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या आर्थिक धोरण आढाव्यात आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशातील जीडीपी वाढीचा अंदाज 6.1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वर्तविला आहे. रिझर्व्ह बँकेचा हा अंदाज सरकारला मोठा धक्का बसला आहे. आरबीआयने म्हटले आहे की आर्थिक स्थिती आणखी कमकुवत झाली आहे आणि उत्पादनातील तफावत नकारात्मक दिशेने राहिली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या धोरणात्मक आढाव्या पूर्वी रिझर्व्ह बँकेने जाहीर केले होते की सन २०१९-२० या आर्थिक वर्षात जीडीपी दर ६.१ टक्के राहील. त्याचबरोबर नोमुरासह विविध संस्थांनीही जीडीपी वाढीचा अंदाज कमी वर्तविला आहे.
लोकांचा अर्थव्यवस्थेचा विश्वास कमी झाला
एवढेच नव्हे तर सरकारने लोकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वासही गमावला आहे. आरबीआयच्या सर्वेक्षण अहवालानुसार नोव्हेंबरमध्ये ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक ८५.७ पर्यंत खाली आला. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासूनची ही सर्वात खालची पातळी आहे. ग्राहक आत्मविश्वास निर्देशांकात घसरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी झाला आहे आणि ग्राहक खरेदी करणंच पसंत करत नाहीत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही चिंतेची बाब मानण्यात आली आहे.
वाहन उद्योग मंदावला
नोव्हेंबरमध्येही वाहन उद्योगातील मंदी कायम राहिली. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये वाहन क्षेत्राच्या एकूण विक्रीत वार्षिक आधारावर १२.०५ टक्क्यांनी घट झाली. त्याचबरोबर एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत विक्रीत सुमारे १६ टक्क्यांनी घट झाली आहे. या काळात उत्पादनही १३.७५ टक्क्यांनी कमी झाले आहे. नोव्हेंबरमध्ये एकूण विक्री १,७९२,४१५ वाहने होती. एका वर्षा पूर्वी याच काळात ही विक्री २,०३८,००७ वाहने इतकी होती.
औद्योगिक उत्पादन देखील कमी झाले
ऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादन (आयआयपी) मध्ये ३.८ टक्क्यांनी घट झाल्याचे सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार औद्योगिक उत्पादनात सप्टेंबरमध्ये ४.३ टक्के आणि ऑगस्टमध्ये १.४ टक्क्यांनी घट झाली आहे.
किरकोळ महागाई वाढ
कांदे, डाळी आणि मांस, प्रथिने सारख्या इतर भाजीपाल्यांच्या किंमती वाढल्यामुळे नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्क्यांवर गेला. तीन वर्षांतील उच्च पातळी आहे. यापूर्वी जुलै २०१६ मध्ये किरकोळ महागाई ६.०७ टक्के होती. आकडेवारीनुसार, महिन्याभरात महागडा भाजीपाला, डाळी आणि प्रथिनेयुक्त खाद्यपदार्थामुळे ग्राहक किंमत निर्देशांक आधारित किरकोळ महागाई वाढली आहे.
Web Title: Former Finance Advisor To Nation Arvind Subramanian Slams PM Narendra Modi Government for Economy Slowdown.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार