अधिकाऱ्यांच्या नियुक्तीतून भाजप कर्नाटक सरकारकडून वसुली | मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांमार्फत करोडोची वसुली

बेंगळुरू, १२ जुलै | महराष्ट्रातील सरकारवर भारतीय जनता पक्षाने वसुली सरकार असल्याचा आरोप सातत्याने केला आहे. मात्र आता भाजप मध्ये वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी किती मोठी वसुली केली जाते ते समोर आल्याने खळबळ माजली आहे. विशेष महाराष्ट्रात मुंबई पोलीस आयुक्तांनी आरोप केल्यांनतर सीबीआय आणि ईडी वेगाने कामाला लागली होती. त्यासाठी कारण दिलं गेलं की वरिष्ठ अधिकाऱ्याने आरोप केल्याने प्रकरण गंभीर आहे. मात्र आता कर्नाटकमधील एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्री येदियुरप्पा नियुक्त्यांच्या बदल्यात त्यांच्या नातेवाइकांमार्फत करोडो रुपयांची वसुली करत होते अशी धक्का दायक माहिती समोर आली आहे.
कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (केएसपीसीबी) माजी अध्यक्ष डॉ. सुधींद्र राव यांनी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या आणखी एका भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट केल्याने खळबळ उडाली असून, काँग्रेसने भाजप नेतृत्व आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधून याप्रकरणी सीबीआय, ईडीसह अन्य संस्थेमार्फत चौकशीची मागणी केली आहे. या सरकारी पदावर नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी १६ कोटी रुपये मागितल्याचा गौप्यस्फोट करताना सुधींद्र राव यांनी स्वत: सौदा कसा झाला, त्यासाठी काय काय करावे लागले, हे सविस्तरपणे सांगितले. ३० डिसेंबर २०१९ मध्ये सुधींद्र राव यांची केएसपीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती याच वायद्याने करण्यात आली होती की, १६ कोटींची रक्कम ते आपल्या कार्यकाळात चुकती करतील. सुधींद्र राव म्हणाले की, ही रक्कम उभी करण्यासाठी मला माझी संपत्तीही विकावी लागली. काँग्रेसचे नेते गुंडूराव यांनी सीबीआय, ईडीमार्फत चौकशीची मागणी केली.
व्हिडिओत नेमकं काय म्हटलंय ?
* व्हिडिओ बातचीतमध्ये सुधींद्र राव यांनी दिलेल्या माहितीनुसार रोख ९.७५ कोटी रुपये मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे नातेवाईक मरईस्वामी यांना वेगवेगळ्या तारखांना देण्यात आले.
* ही रक्कम जानेवारी ते फेब्रुवारी २०२० दरम्यान देण्यात आली. त्यानंतर मरईस्वामी यांनी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र आणि नातू शशिधर मार्डी, जवळचे नातेवाईक संजय श्री यांच्याशी सुधींद्र राव यांची भेट घालवून दिली.
या भेटीत राव यांच्यासमक्ष नवीन अटी ठेवण्यात आल्या.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Former KSPCB Chief Dr Sudhir Rao made serious corruption allegations on Karnataka CM B S Yediyurappa news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | गुंतवणूकदार तुटून पडले या शेअरवर, जिओ फायनान्शिअल शेअरबाबत अपडेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE