5 February 2025 7:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

सोशल मीडिया, फेक न्यूजमार्फत बेरोजगारांचे लक्ष काही काळासाठी इतरत्र वळवता येईल पण...

Former RBI governor Raghuram Rajan, Exports over imports, Dangerous, Unemployment

मुंबई, २५ ऑक्टोबर: एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये रघुराम राजन यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. देशातील बेरोजगारीचे वाढते प्रमाण आणि तरुणांच्या आयुष्यावर होणाऱ्या दूरगामी परिणामांवर त्यांनी सखोल भाष्य यावेळी केलं. आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत आयातीपेक्षा निर्यातीवर भर देण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांबद्दलही राजन यांनी इशारा दिला. निर्यातीला प्राधान्य देण्याचे प्रयत्न यापूर्वीही देशात झाले असून ते आतापर्यंत अयशस्वी ठरले आहेत, याकडेही राजन यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

मोदी सरकारने आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत आयातीवरील अवलंबित्व कमी करून निर्यातीला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. मात्र, हे धोकादायक असून त्यामुळे नवीन रोजगारनिर्मिती होणार नाही आणि पर्यायाने संतप्त तरुणांचा उद्रेक होईल, असा इशारा आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.

सोशल मीडिया आणि फेक न्यूज यांचा वापर करून लक्ष विचलित करता येते, मात्र अखेरीस असे प्रयत्न अपयशी ठरतात, असे सूचक विधानही रघुराम राजन यांनी या वेळी केले. बेरोजगार तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवता येईल पण ते फारच अल्प काळासाठी. जर त्यांना रोजगार मिळाला नाही तर ते अखेर रस्त्यावर उतरतील, असे राजन म्हणाले.

निर्यातीचे प्रमाण वाढवायचे असेल तर आयातही वाढली पाहिजे. देशातील निर्यातदारांना आपली निर्यात स्वस्त ठेवण्यासाठी आयात करण्याची गरज असते. चीनने इतर देशांतून विविध कच्च्या मालांची आयात केली आणि त्याचा वापर करून उत्पादित केलेल्या मालाची निर्यात केली. त्यामुळे चीन हा सर्वांत प्रबल निर्यातदार देश बनला, असे राजन यांनी सांगितले. देशांतर्गत उत्पादनासाठी कमी शुल्क आकारून उत्पादननिर्मितीला पोषक वातावरण तयार केले पाहिजे, असे मतही राजन यांनी या वेळी व्यक्त केले.

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली होती. त्यावेळी, आत्मनिर्भर भारतवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत इशाराही दिला होता. “यापूर्वीही अशाप्रकारच्या धोरणांचा अवलंब केला गेला होता. परंतु त्याचा कोणताही फायदा झाला नाही. आत्मनिर्भर भारतातून सरकारला नक्की काय म्हणायचं आहे हेदेखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जर हे उत्पादनासाठी वातावरण तयार करण्याविषयी असेल तर ते ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम सादर करण्यासारखंच आहे,” असं राजन म्हणाले.

“जर हा संरक्षणवादाचा मुद्दा असेल तर दुर्दैवाने भारताने अलीकडेच दरवाढ केली आहे. मला वाटतं की या मार्गाचा अवलंब करण्यात काहीही अर्थ नाही, कारण आपण यापूर्वीच तसा प्रयत्न केला आहे. यापूर्वी आपल्याकडे लायसन्स परमिट व्यवस्था होती. संरक्षणवादाची ती पद्धत समस्या निर्माण करणारी होती. त्यामुळे काही कंपन्यांना फायदा झाला, परंतु काहींसाठी ते समस्या निर्माण करणारे ठरले,” असं राजन म्हणाले होते. भारताला शिक्षण क्षेत्रात अधिक मेहनत करण्याची गरज आहे. आपण अन्य देशांना शिक्षण उपलब्ध करून देऊ शकू असंही राजन यांनी नमूद केलं होतं.

 

News English Summary: The Modi government has decided to give priority to exports by reducing its dependence on imports under the Self-Reliance India initiative. However, it is dangerous as it will not create new jobs and alternatively there will be an outbreak of angry youth, warned former RBI governor Raghuram Rajan. The use of social media and fake news can be distracting, but in the end such attempts fail, Raghuram Rajan said. Unemployed youth can be diverted but only for a very short time. If they don’t get employment, they will eventually take to the streets, Rajan said.

News English Title: Former RBI governor Raghuram Rajan said giving priority to exports over imports is dangerous there will be an outbreak of youth News updates.

हॅशटॅग्स

#Raghuram Rajan(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x