20 April 2025 10:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

गॅस सिलेंडरचे अनुदान तुमच्या खात्यावर जमा होत नाही | काय असावं कारण?

Gas cylinder, subsidy, Not credited in bank account

नवी दिल्ली, २९ ऑक्टोबर: केंद्र सरकार दर महिन्याला घरगुती गॅस सिलेंडरचे दर जाहीर करत होते. त्यामुळे दर महिन्याला गॅस सिलेंडरची किंमत बदलत असून, त्यामागील अनुदान देखील बदल होते. आठशे रुपयांच्या सिलिंडरचे साधारण दोनशे रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या आधारकार्डला जोडलेल्या बँक खात्यात जमा होत असे.

सध्या अनुदानित आणि विना अनुदानित स्वयंपाक गॅस सिलिंडरची (एलपीजी) किंमत जवळपास सारखीच आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे अनुदान जमा होत नसल्याचा दावा गॅस वितरक आणि पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला. केंद्र सरकारने जून 2020 पासून घरगुती स्वयंपाक गॅस सिलिंडरची आधारभूत किंमत 579 पर्यंत खाली आणली आहे. त्यानंतर गॅसच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

दरम्यान, गॅस सिलिंडरचा दर पुन्हा एकदा वाढल्यास ग्राहकांच्या खात्यात अनुदान जमा होईल अशी पुस्ती गॅस वितरक आणि पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जोडली. सध्या अनुदानित आणि विना अनुदानित घरगुती गॅसच्या किंमतीत फारसा फरक राहिला नसून, आता सिलिंडरमध्ये केवळ पंधरा ते वीस रुपयांची तफावत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अनुदान जमा होत नाही असं काही गॅस वितरक संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान, होम डिलीव्हरीचे नियम बदलत आहेत, मात्र किंमती नाही. सिलिंडर चोरट्यांना रोखण्यासाठी आणि खर्‍या ग्राहकाची ओळख पटविण्यासाठी कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. नवीन नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होईल, ज्याचा परिणाम फक्त घरगुती सिलिंडरवर होईल. तथापि, जुना नियम व्यावसायिक सिलिंडरवर लागू राहील. LPG सिलिंडरच्या होम डिलिव्हरीमध्ये कंपन्यांनी ऑथेंटिकेशन कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांतर्गत, गॅस वितरणवेळी ओटीपी क्रमांकाची आवश्यकता असेल. इतकेच नाही तर हा नियम लागू करण्यासाठी ऍप ही तयार करण्यात आला आहे.

 

News English Summary: The central government was announcing the rates of domestic gas cylinders every month. As a result, the price of a gas cylinder changes every month, and the subsidy behind it also changes. A subsidy of around Rs 200 per cylinder of Rs 800 was deposited in the bank account linked to the customer’s Aadhaar card. Currently the price of subsidized and unsubsidized cooking gas cylinder (LPG) is almost the same. Gas distributors and petroleum company officials claimed that the subsidy for gas cylinders was not being collected.

News English Title: Gas cylinder subsidy is not getting credited into the bank account find out reason News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या