8 January 2025 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
x

मोदींचा नवा भारत क्षमतेच्या तुलनेत कमी वृद्धी करतोय; Moody`s ने रेटिंग घटवलं

Global ratings agency Moodys, downgrades India rating

नवी दिल्ली, २ जून: जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल २२ वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट केली आहे. भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता येणार नाही शिवाय अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेजही पुरेसे नाही. त्यामुळे कमी वृद्धीचा धोका काही काळ राहणार आहे. म्हणूनच मूडीजनं बीएए २ वरून भारताची रेटिंग बीएए ३ केली आहे.

मागील काही कालावधीपासून भारत आपल्या क्षमतेच्या तुलनेत कमी वृद्धी करत आहे . तसेच कर्जाचं ओझं वाढत असून कर्जाची परतफेड होण्यात अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे वित्तीय प्रणालीवर दबाव येणार असल्याचं भाकितही मूडीजनं केलं आहे.

बीएए ३ रेटिंग म्हणजे गुंतवणूक ग्रेड मानली जात आहे. भारतात गुंतवणूक ग्रेड असणारी अर्थव्यवस्था काही काळ राहील. मूडीजनं २०१७ मध्येच रेटिंग वाढवून बीएए २ केली होती. पण, सॉवरिन क्रेडीट प्रोफाईल पोषक नाही. विशेष म्हणजे मूडीजचा अंदाज कोरोनामुळे वर्तवला नाही. तर मागील वर्षीच हा अंदाज वर्तवला होता. परंतु २०२१ मध्ये भारताचा जीडीपी ८ टक्के पेक्षा पुढे जाणार ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.

कोरोनातून बाहेर पडण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी दिलेले २० लाख कोटींचे पॅकेज पुरेसे नसून येत्या कालावधीत आर्थिक वृद्धी आणण्यासाठी उपयोगी नसल्याचं मत मूडीजनं व्यक्त केलं आहे. कोरोनामुळे भारताचा जीडीपी २०२० मध्ये ४ टक्के पर्यंत येईल. परंतु २०२१ मध्ये ८.७ टक्के जीडीपी राहील तसेच त्यानंतर ६ टक्के जीडीपी राहील.

तत्पूर्वी, मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस या रेटिंग एजन्सीने चीन सोडल्यास भारत, अमेरिकेचा विकास दर घटणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यावेळी मुडीजने भारताचा २०२० वर्षाचा जीडीपीचा अंदाज ५.३टक्क्यांवरून केवळ २.५ टक्के राहणार असल्याचे म्हटले होते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार मूडीजने त्यांच्या ‘ग्लोबल मायक्रो आउटलुक 2020-21’ मध्ये म्हटले होते की, अंदाजित विकास दरामध्ये भारतात २०२० मध्ये मोठी घसरण होणार आहे. यामुळे २०२१ मध्ये मागणी आणि आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा आधीपेक्षा अधिक पटींनी प्रभावित होण्याची शक्यता आहे. भारतातील बँका आणि वित्तीय कंपन्यांकडे रोखीची मोठी कमतरता असल्याने आधीच कर्ज देण्यासाठी अडचणी येत आहेत.

 

News English Summary: Moody’s downgrades India’s rating after 22 years India will no longer be able to implement its economic policies effectively through various institutions and will face many challenges. Even the financial package of Rs 20 lakh crore announced by the Center is not enough.

News English Title: Global ratings agency Moodys downgrades India rating News latest updates.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x