14 January 2025 6:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Google चा मोठा निर्णय, Jio App मध्ये तब्बल 33,737 कोटोची गुंतवणूक करणार

Google to invest, Jio Platform, Google, Facebook

नवी दिल्ली, १४ जुलै : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य कंपनी असणाऱ्या Google ने भारतासाठी दोन दिवसांपूर्वी मोठी आनंदाची बातमी दिली होती. गुगलने आपले भविष्यातले गुंतवणुकीचे आडाखे सादर केले आहेत आणि फक्त भारतामध्ये त्यांची १० अब्ज डॉलर्सची म्हणजे जवळपास ७५००० कोटी रुपयांची गुंतवणूक असणार आहे. Google चे CEO (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुंदर पिचाई यांनी ही मोठी घोषणा केली होती. Google For India अंतर्गत भारताच्या डिजिटायझेसनसाठी ही रक्कम असेल असं म्हटलं होतं.

“आम्ही गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी) गुंतवणूकीची घोषणा केली. भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार,” असं ट्विट पिचई यांनी केलं होते.

दरम्यान, CNBC’च्या वृत्तानुसार, मुकेश अंबानींची कंपनी जिओच्या प्लॅटफॉर्ममध्ये गुगल तब्बल 33,737 कोटोची गुंतवणूक करणार असल्याचं वृत्त दिलं आहे. याबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात होती, मात्र त्यावर आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. फेसबुकने जिओसोबत ९.९९ टक्क्यांची भागिदारी म्हणून ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी यांनी आत्तापर्यंत जिओची भागिदारी विकून तब्बल 1.18 लाख कोटी रुपये कमावले आहेत. दरम्यान 33,737 कोटो गुंतवणुकीच्या मोबदल्यात Google ला Jio Platform मध्ये ७.७ टक्के भागीदारी हिस्सा मिळणार आहे.

 

News English Summary: Reliance Ind Chairman MukeshAmbani welcomes GOOGLE as a strategic partner at the RILAGM, says “A company that needs no introduction, Google to invest Rs 33,737 crore for 7.7% stake in Jio Platforms.

News English Title: Google to invest Rs 33737 crore  in Jio Platforms News Latest Updates.

हॅशटॅग्स

#JIO(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x