16 January 2025 6:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

चौकीदारा भाजपा प्रदेशाध्यक्षाचा मुलगा निघाला कॉपीबहाद्दर, सापडल्या तब्बल २७ चिठ्ठ्या

BJP, Narendra Modi, Gujarat

गांधीनगर: गुजरात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीतू वाघानी यांचं नाव सध्या अचानक चर्चेत आलं आहे. वाघानी यांच्या मुलाला परीक्षेत कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. बॅचलर्स ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशनची (बीसीए) परीक्षा देणाऱ्या वाघानी यांचा मुलगा मीतकडे तब्बल २७ चिठ्ठ्या सापडल्या. यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत.

मीत वाघानीसह इतर ४ विद्यार्थ्यांना देखील रंगेहात पकडण्यात आलं. परंतु, याबद्दलची माहिती देताना भावनगर कॉलेजचे मुख्याध्यापक वाटलिया यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही एकूण ४ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडलं. यामध्ये गुजरात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जीतू वाघानी यांचा मुलगा कोण आहे, याबद्दलची कोणतीही माहिती आमच्याकडे सध्या नाही,’ असं वाटलिया म्हणाले. याबद्दल बोलताना मुलावर योग्य ती कारवाई होईल, असं वाघानी म्हणाले. ‘मीतला परीक्षेत कॉपी करताना पकडण्यात आलं. त्यावर विद्यापीठ योग्य ती कारवाई करेल,’ असं वाघानी यांनी सांगितलं.

मीत वाघानी भावनगर विद्यापीठात परीक्षा देत होता. त्यावेळी निरीक्षकांना त्याच्याकडे सत्तावीस चिठ्ठ्या सापडल्या. मीत वाघानी एम. जे. सी. सी महाविद्यालयात बीसीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार असलेले जीतू वाघानी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे ‘चौकीदार’ लावतात. आता या चौकीदाराच्या मुलावर विद्यापीठ नेमकी काय कारवाई करणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x