23 December 2024 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा Bank Account Alert | बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते, लिमिट ओलांडल्यास टॅक्स भरावा लागेल, अनेकांना इन्कम टॅक्स नोटीस Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH
x

गाव असो की शहर, स्वतःचा उद्योग | SBI कस्टमर सर्विस पॉइंट सुरु करा | अर्ज करा, कमाई सुरु | वाचा

SBI CSP point Apply

मुंबई, २९ जून | नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात असणाऱ्या लोकांना आता एक खूप चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ह्या बँकेचे CSP म्हणजेच ‘कस्टमर सर्विस पॉइंट’ उघडून तुम्ही दर महिन्याला भरपूर पैसे मिळवू शकता. काय आहे हे कस्टमर सर्विस पॉइंट? कसे उघडता येईल.

ह्याबाबत ट्वीट करून एसबीआयने माहिती दिली आहे. ती आपण सविस्तर जाणून घेऊया. एसबीआयच्या एका ग्राहकाने ट्वीट करून असा प्रश्न विचारला होता की मला कस्टमर सर्विस पॉइंट सुरू करायचे असेल तर काय करावे लागेल?

ह्यावर एसबीआयने ट्वीट करून उत्तर दिले आहे. एसबीआय म्हणत आहे की तुमच्या विभागातील एसबीआयच्या रिजनल बिजनेस ऑफिसमध्ये एक अर्ज करून तुम्ही कस्टमर सर्विस पॉइंट उघडू शकता. रिजनल बिजनेस ऑफिस कुठे आहे हे एसबीआयच्या https://bank.sbi/web/home/locator/branch ह्या वेबसाइट वरुन शोधता येईल. रिजनल बिजनेस ऑफिसमध्ये अर्ज करून तो स्वीकारला गेल्यावरच त्यांच्या संमतीने तुम्ही CSP सुरु करू शकता.

कस्टमर सर्विस पॉइंट म्हणजे नक्की काय?
एसबीआयचा कस्टमर सर्विस पॉइंट म्हणजे एक प्रकारे बँकेची एक शाखाच असते. तेथे अकाऊंट उघडणे, अकाऊंट मध्ये पैसे जमा करणे अशी बँकेच्या संदर्भातली कामे होऊ शकतात. मुख्यत्वे ग्रामीण भागात किंवा अशा भागात जेथे बँकेच्या शाखा कमी आहेत तेथे कस्टमर सर्विस पॉइंटची आवश्यकता भासते. शिवाय शहरातही बँकेची शाखा लांबच्या अंतरावर असेल तेथे ग्राहकांच्या सोयीसाठी CSP सुरु करता येते.

कस्टमर सर्विस पॉइंटसाठी पात्रतेचे निकष काय आहेत? अर्ज कसा करावा?
भारतातील कोणीही सज्ञान नागरिक कस्टमर सर्विस पॉइंटसाठी अर्ज करू शकतो. एसबीआयच्या रिजनल बिजनेस ऑफिसमध्ये प्रत्यक्ष अथवा वेबसाइट वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.

अर्जदाराने खालील कागदपत्रे दाखवणे आवश्यक आहे.
* पॅन कार्ड
* आधार कार्ड
* पत्ता व त्यासाठी प्रूफ(लाइट बिल)
* दुकान किंवा जेथे CSP सुरु करता येईल अशा जागेचा पत्ता आणि प्रूफ
* पासपोर्ट साइजचे २ फोटो.

ह्या सर्व कागदपत्रांसह अर्ज दाखल केला की त्याची छाननी होऊन एसबीआयच्या निकषांप्रमाणे अर्जदारांची निवड होते व त्यांना तसे संमतीपत्र मिळते. त्यानंतर एसबीआयच्या मार्गदर्शनाखाली अर्जदार CSP सुरु करू शकतो.

कशा पद्धतीने होते कमाई?
CSP सुरु झाल्यानंतर तेथे पुरवल्या गेलेल्या प्रत्येक सेवेबद्दल बँक कमिशन देते. उदाहरणार्थ अकाऊंट उघडण्याबद्दल कमिशन, ठेव पावती बद्दल कमिशन इत्यादि. बँकेच्या अशा सर्व सेवा कस्टमर सर्विस पॉइंट येथे देऊन तुम्ही भरपूर कमाई करू शकता.

मात्र बँकिंगचे कामकाज आता ऑनलाइन असल्यामुळे संगणकाचे सर्व ज्ञान आणि तसा सेटअप असणे आवश्यक आहे. शिवाय इंटरनेटचे सर्व ज्ञान असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीच्या योजना आणून सरकार ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय हि बँकिंगबरोबर निगडित सेवा असल्याने, यावर लॉकडाऊनचा जास्त प्रभाव न पडून इच्छुकांना आपली आर्थिक बाजू सांभाळणे शक्य होईल. हे सर्व सरकारच्या डिजिटल इंडिया ह्या धोरणाअंतर्गत केले जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: How to apply for  CSP point of SBI online news updates.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x