29 December 2024 12:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, अशी संधी सोडू नका - NSE: KPIGREEN Vodafone Idea 5G | VI ची 5G सर्विस भारतात लॉन्च; तुमच्या शहराचे नाव 'या' यादीमध्ये आहे की नाही चेक करा LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल UPI New Rule | 1 जानेवारीपासून UPI चा नवा नियम लागू; आधीपेक्षा जास्त पैसे होतील ट्रान्सफर, किती लिमिट वाढवली आहे पहा Business Idea | गृहिणींनो इकडे लक्ष द्या; आता घरबसल्या स्वावलंबी व्हा, कमी पैशांत सुरू होणारे जबरदस्त व्यवसाय Lava Yuva 2 5G | नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री, 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत, या स्मार्टफोनचे फीचर्स आहेत कमालीचे SIP Mutual Fund | पगारदारांनो, म्युच्युअल फंडचा श्रीमंत करणारा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कमी गुंतवणुकीतून मिळेल 6.32 कोटी परतावा
x

कंपनीत कर्मचारी आहात? | EPF कापला जातो, मग बँक डिटेल्स अशी ऑनलाईन अपडेट करा - स्टेप्स वाचा

EPFO

मुंबई, १५ जुलै | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आपल्या खातेधारकांना घरी बसून बँक डिटेल्स अपडेट करण्याची सुविधा देत आहे. त्यामुळे तुम्ही पीएफ अकाउंटसह आपले बँक अकाउंट सहजरित्या अपडेट करू शकता. बँक अकाउंटची माहिती अपडेट केली नाही, तर तुम्ही आपल्या पीएफ अकाउंटतून पैसे काढू शकणार नाही.

जर चुकीच्या बँक अकाउंटचे डिटेल्स आपल्या यूएएनशी (UAN) लिंक झाले, तर काळजी करण्याची गरज नाही. कर्मचारी घरी बसून यूएएनमध्ये बँक अकाउंटचे डिटेल्स अपडेट करू शकतात. तर मग तुम्ही आपल्या बँकेचे डिटेल्स कसे अपडेट करायचे, ते जाणून घ्या;

असे करा बँक अकाउंट डिटेल्स अपडेट:
* सर्वात आधी EPFO च्या युनिफाइड मेंबर पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर जा.
* याठिकाणी UAN आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
* यानंतर टॉप मेन्यूमधील ‘मॅनेज’ ऑप्शनवर जा, त्यानंतर ड्रॉप डाऊन मेन्यूमधून ‘केवायसी’ निवडा.
* आता तुमची बँक निवडा आणि बँक अकाउंट नंबर, नाव आणि आयएफएससी कोड अपलोड करुन ‘सेव्ह’ बटनवर क्लिक करा.
* ही माहिती नियोक्ताद्वारे मंजूर झाल्यानंतर, तुमचे अपडेटेड बँक डिटेल्स अप्रूव्ह केवायसी सेक्शनमध्ये दिसतील.
* त्यानंतर आपल्या नियोक्ताला पुराव्याची कागदपत्रे द्या.

अशा प्रकारे चेक करा PF बॅलन्स:
* ईपीएफओ सदस्यांना www.epfindia.gov.in वेबसाइटवर जावे लागेल.
* त्यानंतर ‘Our Services’ टॅबमधून ‘For Employees’ ऑप्शनवर क्लिक करा.
* यानंतर ‘Services’ टॅब वरून ‘Member Passbook’ वर क्लिक करा.
* तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचा UAN आणि पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही आपल्या पीएफ खात्याचे पासबुक पाहू शकाल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to update bank account details in EPF account in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#EPFO(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x